बुलढाणा : कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील हिरे कुडी या गावात दिगंबर जैनाचार्य १०८ श्री कामकुमार नंदीजी गुरुदेवांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. घटनेच्या निषेधार्थ देऊळगाव राजा शहरात आज बुधवारी व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेऊन सकल जैन समाजाचे वतीने तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून आरोपींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. निषेध मूक मोर्चात सकल जैन समाजातील नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले. गत सप्ताहात समाजकंटकांनी जैन मुनिंची क्रूरपणे हत्या केली. त्यांच्या शरीराच्या विविध अवयवांचे तुकडे करून व पोत्यामध्ये भरून ते बोअरवेल मध्ये टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यामुळे देशभर सकल जैन समाजामध्ये तीव्र आक्रोश निर्माण झाला आहे. अहिंसा प्रेमी व शांतता प्रिय असलेल्या जैन समाजावर या घटनेमुळे आघात झाल्याचे निवेदनात नमूद आहे.