बुलढाणा : कर्नाटक राज्यामधील बेळगांव जिल्ह्यातील हिरेकोडी येथील तपस्वीरत्न कामकुमार नंदीजी महाराज यांच्या क्रूर हत्येचा चिखली येथे जैन समाज बांधवांनी अहिंसक निषेध नोंदवला. आज गुरुवारी शहरातून मूक मोर्चा काढून प्रकरणी ‘सीबीआय’तर्फे तपास करण्याची मागणी करण्यात आली.
सकल जैन व इतर समाज बांधवांनीही आपली दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध नोंदवला. जैन स्थानक (गांधीनगर) येथून मूक निषेध मोर्चास प्रारंभ झाला. सकल जैन समाज व भारतीय जैन संघटनेतर्फे निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित जैन यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

अमित जैन, हेमंत सिसोदिया, संदीप वायकोस, अमोल सुलाखे, अमोल पालकर, अमोल बेलोकर, जयेश बेलोकर, बेलोकर, अमोल बोन्द्रे, कैलास सोनटक्के, महेन्द्र वायकोस, कीर्ती वायकोस, सौरभ कोठारी, विनोद रुद्राक्ष, रितेश सुराणा, सतिष बेलोकर, विलास नाके संजय, सिसोदिया, पृथ्वीराज काळे, रवि वायकोस, संजय जैन जयेश नगरीया, अभय कोटेचा, मनीष दर्डा यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

Story img Loader