लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : नववर्षात सोने- चांदीचे दर वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली होती. परंतु ६ जानेवारीला प्रथमच सोने- चांदीचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. आता पुन्हा चांदीचे दर घसरले आहे. तर सोन्याच्या दरातही बदल बघायला मिळत आहे. त्यामुळे गुरुवारी (९ जानेवारी) सोन्याचे दर काय होते? याबाबत आपण जाणून घेऊ या.
हल्ली नागपूरसह राज्याच्या विविध भागात लग्न, वाढदिवसासह इतरही कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमात आजही अनेक नागरिक सोने- चांदीचे दागिने वा वस्तू भेट देत असतात. त्यामुळे आता नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडे ग्राहकांची चांगलीच गर्दी दिसत आहे. या ग्राहकांकडून लग्न असल्यास मंगळसूत्र वा इतर दागिने, बारसे असल्यास बाळासाठी चाळ तर इतरही ग्राहकांकडून विविध कार्यक्रमानुसार दागिन्यांना मागणी आहे.
आणखी वाचा- नवीन वर्षात पुन्हा एकदा नागनदी प्रदुषण मुक्तीसाठी प्रयत्न, काय आहे योजना?
दरम्यान, नववर्षात सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंता होती. परंतु गुरूवारी ९ जानेवारीला सोन्याच्या दरात बदल झाला. आहे. नागपुरातील सराफा बाजारात ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ७७ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार २०० रुपये नोंदवले गेले. हे दर ८ जानेवारी २०२५ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७७ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७२ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार ६०० रुपये होते. हे दर ६ जानेवारी २०२५ रोजी प्रति दहा ग्राम ७७ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार २०० रुपये होते. हे दर दुसऱ्या दिवशी गुरूवारी (९ जानेवारी) सारखेच होते. परंतु चांदीच्या दरात मात्र घट झाली. येत्या काळात सोन्याच्या दरात वाढ होण्याचे संकेत असल्याचे सराफा व्यवसायिकांचे म्हणणे आहे.
आणखी वाचा-अधिकाऱ्यांच्या उत्तराने वनमंत्री नाराज, वनाधिकाऱ्यांना दिली तंबी…
चांदीच्या दरामध्ये घसरण
नागपुरातील सराफा बाजारात ३ जानेवारी २०२५ ला चांदीचे दर ८९ हजार रुपये प्रति किलो होते. हे दर ९ जानेवारी २०२५ रोजी ९० हजार ६०० रुपये प्रति किलो नोंदवण्यात आले. त्यामुळे ३ जानेवारी २०२५ रोजीच्या तुलनेत नागपुरात ९ जानेवारी २०२५ रोजी चांदीच्या दरात १ हजार ६०० रुपये प्रति किलो घट झाली आहे.