नागपूर : आसाममधील सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून स्थलांतर करुन आणलेल्या वाघिणीला खुल्या पिंजऱ्यातून जंगलात सोडले. ही वाघीण सिमिलीपालच्या मुख्य भागात स्थिरावली आहे. या व्याघ्रप्रकल्पाची प्रशिक्षित देखरेख चमू तिच्यावर लक्ष ठेवून आहे.

‘यमुना’नावाच्या या वाघिणीला महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून २७ ऑक्टोबरला ओडिशात आणण्यात आले. त्यानंतर या वाघिणीला सिमिलीपाल येथे तयार करण्यात आलेल्या खुल्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. याठिकाणी तिने शिकार देखील केली होती. साधारणपणे इतर राज्यातून किंवा इतर व्याघ्रप्रकल्पातून स्थलांतर करुन आणलेला आणलेला वाघ किंवा वाघीण नवीन जागा सहज स्वीकारत नाही. मात्र, ‘यमुना’ या वाघिणीची वर्तणूक सिमिलीपालच्या खुल्या पिंजऱ्यात देखील सामान्य होती. त्यामुळेच तिला अवघ्या आठवडाभरात जंगलात सोडण्यात आले. वाघ स्थलांतरण प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून दोन वाघिणी ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पात आणण्यात येणार आहेत. त्यापैकी ‘यमुना’ ही वाघीण या व्याघ्रप्रकल्पात सोडण्यात आले.

second phase of tiger migration is complete with another tigress captured from Tadoba
दुसरी वाघीणही महाराष्ट्रातून पोहोचली ओडिशात…आंतरराज्यीय स्थलांतर अखेर…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Police seized Gutkha worth rupees 21000 at Sawal Ghat
गुजरातमधून महाराष्ट्रात गुटखा तस्करी, वाहनासह १५ लाखाचा मुद्देमाल जप्त
Aruna Sabane asked harassed Priya Phuke is not beloved BJP sister
प्रिया फुके ही सरकारची ‘लाडकी बहीण ‘नाही आहे का? सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांचा सवाल
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
sahyadri tiger project
१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…
Loksatta vyaktivedh Dairy personality Ravindra Pandurang Apte former president of Gokul passed away
व्यक्तिवेध: रवींद्र आपटे
nashik tribal students
आदिवासी विद्यार्थ्यांना आता सामाजिक, भावनिक शिक्षण – ”अभिव्यक्ती” प्रकल्प

हेही वाचा…मेहकरात वाटपासाठी ४० खोके आलेत, प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक आरोप

या व्याघ्रप्रकल्पातील वाघांमधील जनुकीय पूल सुधारण्यासाठी स्थलांतरणाचा हा प्रकल्प आखण्यात आला. या व्याघ्रप्रकल्पातील ५० टक्के वाघ ‘मेलेनिस्टीक’ आहेत. दरम्यान, आणखी एका वाघिणीला आणण्यासाठी आसाम वनविभागाची वन्यजीव विभागाची चमू महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पोहोचली आहे. ओडिशात सध्या ३० वाघ असून त्यापैकी २७ वाघ सिमिलीपाल व्याघप्रप्रकल्पात आहेत. या व्याघ्रप्रकल्पात ‘मेलेनिस्टिक’ वाघांची संख्या अनोखी असली तरी संरक्षित क्षेत्रातील वाघांसाठी ते धोकादायक ठरु शकते. त्यामुळेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरणाच्या परवानगीने महाराष्ट्रातून दोन वाघिणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा…राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, मात्र…

भारतातील हा एकमेव व्याघ्रप्रकल्प

ओडिशातील सिमिलीपाल या व्याघ्रप्रकल्पात एक-दोन नाही तर तब्बल दहा ‘मेलेनिस्टिक’ वाघांची नोंद करण्यात आली आहे. भारतातील हा एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे, ज्याठिकाणी देशातील सर्वच काळे म्हणजेच ‘मेलेनिस्टिक’ वाघ आहेत. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. या व्याघ्रप्रकल्पाला त्याच्या अनुवंशिक रचनेमुळे एक वेगळे ‘कन्झर्वेशन क्लस्टर’ म्हणून ओळखले जाते.

हेही वाचा…Devendra Fadnavis: मुंबईत स्वत:चं घर नसलेला मी एकमेव मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस

अभ्यास काय सांगतो?

बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस येथील पर्यावरणशास्त्रज्ञ उमा रामकृष्णन आणि त्यांचे विद्यार्थी विनय सागर यांच्या नेतृत्वाखाली २०२१ मध्ये एक अभ्यास करण्यात आला. ‘ट्रान्समेम्ब्रेन एमिनोपेप्टिडेज क्यू’ या जनुकामुळे वाघाच्या शरीराच्या वरच्या भागाचा रंग गडद होतो. या अभ्यासानुसार सिमिलिपाल व्याघ्र प्रकल्पातील वाघांमध्ये इतर वाघांच्या तुलनेत जीन्सचा प्रवाह खूपच मर्यादित आहे. परिणामी व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असेही या अभ्यासात संशोधकांनी म्हटले आहे.