बुलढाणा : मागील एका महिन्यांपासून राजकीय संभ्रम कायम ठेवून वरकरणी तळ्यात-मळ्यात अशी भूमिका दर्शविणारे सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे लवकरच ‘तुतारी’ फुंकणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. शिंगणे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याचा मुहूर्त ठरला असून दोन दिवसांत हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

तब्बल पाचवेळा सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदारपद भूषवणारे शिंगणे यांनी मागील महिनाभरापासून मतदारसंघातील राजकीय संभ्रम कायम ठेवला. तांत्रिकदृष्ट्या ते अजित पवार यांच्यासोबत होते, मात्र मनाने शरद पवारांसोबत! यामुळे, महायुतीकडून लढणार की शरद पवारांच्या  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार? याबद्दल संभ्रम कायम ठेवण्याचे त्यांचे डावपेच यशस्वी ठरले. आता त्यांनी ‘तुतारी’ फुंकण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन दिवसात ते शरद पवार गोटात दाखल होणार आहेत. आज त्यांच्या आतील गोटाने याला दुजोरा दिला. रविवार फार तर सोमवारी त्यांचा शरद पवार गटात प्रवेश होणार, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
entry to Narendra Modis meeting venue will be denied if objectionable items are brought
…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत प्रवेशच मिळणार नाही!
Ajit Pawar lashed out at the group over the issue of disclaimer regarding the clock symbol print politics news
घड्याळाबाबत अस्वीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवार गटाला फटकारले

हेही वाचा >>> चिखली मतदारसंघातील हजारो मतदारांची नावे यादीतून गहाळ, काय आहे ‘नागपूर कनेक्शन’

शिंदे गटासह भाजपचाही दावा; इच्छुकही सरसावले

शिंगणे पवार गटात परतणार असल्यामुळे मतदारसंघातील विविध पक्षीय इच्छुकांनी उचल खाल्ली आहे. शिवसेना शिंदे गटापाठोपाठ भाजपनेदेखील सिंदखेड राजा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. दुसरीकडे, त्यांच्या पुतणी गायत्री शिंगणे यांनी मतदारसंघातून लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट असल्याने त्यांची राजकीय ताकद कमी झाली आहे. याउलट भाजप एकसंघ असून पक्षाने नियोजनबद्ध संघटनबांधणी केली आहे. त्यामुळे सिंदखेड राजा मतदारसंघात पक्षाची स्थिती मजबूत आहे. इतर इच्छुक उमेदवारांमध्ये मराठा, कुणबी उमेदवारांची संख्या जास्त असल्याने मतदारसंघात लक्षणीय संख्येने असलेल्या वंजारी समाजाला संधी दिली तर इथे तुल्यबळ लढत होईल. याचा चांगला परिणाम वंजारीबहुल सात ते आठ मतदारसंघात होईल, असा युक्तिवाद मांडे यांनी केला आहे. तशी मागणी त्यांनी प्रदेश भाजपकडे केल्याचे वृत्त आहे. भाजपकडून स्वतः मांटे, प्रवक्ते विनोद वाघ, डॉ. सुनील कायंदे हे याच समाजातील नेते इच्छुक आहेत.

शशिकांत खेडकर यांच्या आशा पल्लवीत

शिंगणे यांचा पवार गटात जाण्याचा निर्णय जवळपास पक्का झाल्याने त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी शशिकांत खेडेकर यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ते मागील काही महिन्यांपासून तयारीला लागलेले आहेत. मात्र, खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे पुतणे योगेश जाधव हेदेखील शिंदे गटाकडून लढण्यास सज्ज आहेत. लोकसभा निवडणुकीतनंतर त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला. यामुळे भाजपमध्ये तीन तर शिंदे गटात दोघे जण अटीतटीला आले आहे. आमदार शिंगणे आघाडीत परतले तर शिवसेना ठाकरे गटाची भूमिका काय राहील, हे पाहणे रंजक ठरणार आहे.    

पुतणीचाही निर्धार पक्का

मागील अनेक महिन्यांपासून मतदारसंघ पिंजून काढणाऱ्या आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या पुतणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष गायत्री शिंगणे यांनी कोणत्याही परिस्थितीत सिंदखेड राजामधून लढण्याचा निर्धार बोलून दाखविला. दुसरीकडे, शिंदे गटासोबतच भाजपने अनपेक्षितपणे दावा केल्याने महायुतीतदेखील वादंग वा दुफळी निर्माण होण्याची चिन्हे आहेत. यातच अजित पवार आपल्या स्वभावानुसार जिद्दीला पेटले तर ते आपल्या हक्काच्या सिंदखेड राजातून तुल्यबळ पर्यायी उमेदवार उतरवण्याची दाट शक्यता आहे. या विविध जलदगती राजकीय घडामोडींमुळे सिंदखेड राजा मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले आहे.