नागपूर : अभ्यासाच्या ताणातून सहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज शनिवारी पारडीत उघडकीस आली. अश्विनी संपत झोडे (१२) असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी झोडे ही आई आणि १५ वर्षीय मोठ्या भावासोबत पारडीतील शिवनगरच्या मागे भाड्याच्या घरात राहत होती. ती सहाव्या वर्गात तर भाऊ आठवीत शिकत होता. तिची आई लोकांच्या घरी घरकाम करून मुलांचे शिक्षण आणि उदरनिर्वाह करते.

हेही वाचा >>> नागपूर :’तुने मेरे बाप का मर्डर किया, अब मै तेरा …’

Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध

अश्विनीच्या वडिलाचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. ती अभ्यासात थोडी मागे होती. गुरुवारी मुलगी घरी एकटीच होती. तिचा मोठा भाऊ खेळायला गेला होता. काही वेळानंतर तो घरी परतला असता अश्विनी दार उघडत नव्हती. त्यामुळे त्याने शेजाऱ्यांना आवाज दिला. त्यांनी खिडकीतून डोकावून बघितले असता मुलगी लटकलेली दिसली. त्यानंतर लगेचच पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मुलीला खाली उतरवले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. गेल्या काही दिवसांपासून ती अभ्यासाचा खूप ताण घेत होती. अभ्यात मागे पडल्यामुळे ती निराशही झाली होती. त्यामुळे तिने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.