नागपूर : एका १२ वर्षीय मुलीने घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना प्रतापनगर ठाण्यांतर्गत गोपालनगर परिसरात घडली. या घटनेचा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. इतक्या कमी वयाच्या मुलीने गळफास लावल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. निशिला संजय बागडे (१२) रा. जोशीवाडी असे मृत मुलीचे नाव आहे.

निशिला सहावीची विद्यार्थिनी होती. तिचे वडील संजय हे टेक्निशियन आहेत तर आई खासगी शाळेत शिक्षिका आहे. सकाळी १० वाजताच्या सुमारास आई-वडील आणि निशिलाची आजी आप-आपल्या कामावर गेले. घरी तिचा ७ वर्षांचा भाऊ होता. दोघांनीही एकत्र बसून चिप्स खाल्ले. ११.३० वाजताच्या सुमारास ऑटो आला आणि लहान भाऊही शाळेत गेला. निशिला घरी एकटीच होती. या दरम्यान तिने घरी हॉलमध्ये छताच्या पंख्याला साडी बांधून गळफास लावला. दुपारी दोन वाजताच्या सुमारास आजी घरी परतली असता निशिला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. आजीने आरडा-ओरड केल्याने शेजारी गोळा झाले. आई-वडिलांना घटनेची माहिती देण्यात आली. तत्काळ तिला खाली उतरवून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी मेडिकलला घेऊन जाण्यास सांगितले. मेडिकलच्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
soldier in Air Force committed suicide by shooting himself in head on duty
थरारक… वायुसेनेच्या जवानाची आत्महत्या, कर्तव्यावर तैनात असताना डोक्यात घातली गोळी अन्…
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!
fox death Mumbai, Third fox death, fox ,
मुंबई : रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू, तीन महिन्यांतील कोल्ह्याच्या मृत्यूची तिसरी घटना
Cement mixer operator died, Metro 9,
मेट्रो ९ च्या कामादरम्यान सिमेंट मिक्सर ऑपरेटरचा मृत्यू, कंत्राटदार आणि सल्लागारास मोठा दंड, चौकशीसाठी समिती स्थापन

हेही वाचा… अकरावीची विद्यार्थिनी गर्भवती निघाली अन ‘ती’ घटना उघडकीस आली…

हेही वाचा… वर्धा : अखेर माजी आमदार अमर काळे लोकसभा लढण्यास तयार, पण…

निशिलाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. कुटुंबीयांनाही याबाबत कोणतीही माहिती नाही. पोलिसांनी शेजाऱ्यांकडेही विचारपूस केली. सर्वांनी सांगितले की, निशिला अभ्यासात हुशार होती. शाळेत जाण्यापूर्वी निशिलाने लहान भावाला जादू दाखवते असे सांगितले होते. उत्सूकतेपोटी ही घटना घडल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Story img Loader