चंद्रपूर येथे १६ ते१८ डिसेंबर दरम्यान आयोजित ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक आणि ललितलेखक डॉ.वि.स.जोग यांची निवड करण्यात आली.डॉ. वि.स. जोग यांनी विविध वाङ् मय प्रकारात लेखन केलेले असून त्यांच्या अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत.
‘नातं’ हे कथासंग्रह; ‘आई’, ‘आम्ही’, ‘संहार’,‘ग्रीष्मदाह’, ‘मकरंद मुमताज’ या कादंबऱ्या; ‘शह-प्रतिशह’, ‘तिघांच्या तीन तऱ्हा’ ही नाटके; ‘दोन झुंजार पत्रकार’,‘कवी आणि कविता’, ‘सावरकर आंबेडकर विचार समीक्षा’,या समीक्षा लेखनासोबतच ‘मार्क्सवाद आणि मराठी साहित्य’ आणि ‘मार्क्सवाद आणि दलित साहित्य’ हे मराठी साहित्याची मार्क्सवादी परिप्रेक्ष्यातून मांडणी करणारे महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित झाले आहे.त्यांना विदर्भ साहित्य संघाचा वाङ् मय पुरस्कार, पु.भा. भावे पुरस्कार इत्यादी पुरस्कारांसोबतच विदर्भ साहित्य संघाचा महत्त्वाचा समाजाला जाणारा जीवनव्रती पुरस्कार आणि सोविएत लँड नेहरू पुरस्काराने गौरविले आहेत.