स्कायडायव्हिंग, आकाशगंगा टीमचे सादरीकरण आणि एअरो मॉडलिंग शो तसेच सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या चित्तथरारक हवाई कवायतींचा आनंद घेतला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने येत्या १९ नोव्हेंबरला एअर शो आयोजित करण्यात आला आहे. त्यापूर्वी गुरुवारी सराव करण्यात आला.१४-एनसीसी एअर विंग कॅडेट्सच्या एअरो मॉडेलिंग शोच्या सरावला सुरुवात झाली. यात रिमोट कंट्रोल आणि कंट्रोल लाईन मॉडेल्स विमाने उडवले जातील. आकाशगंगा टीमचे सादरीकरण झाले.
हेही वाचा >>>नागपूर: शिंदे- फडणवीस सरकारला पडळकर, खोत यांच्याकडून घरचा अहेर!
आकाशगंगाचा ध्वज घेऊन जातील आणि शेवटी संघातील तीन सदस्य आपल्या राष्ट्रध्वजाचा तिरंगा घेऊन उतरतील. यामध्ये १० हवाई योद्धे हजारो फुटावर मेंटनन्स कमांडच्या मैदानात उतरले. सारंग एरोबॅटिक हेलिकॉप्टरने देखील हवाई कवायती सादर केल्या. तर डॉर्नियर विमानातून आठ हजार फूट उंचीवर स्कायडायव्हिंग करण्यात आले. या चित्तथरारक प्रात्यक्षिकाने नागपूर थक्क झाले. एव्र्हो हे मध्यम आकाराचे वाहतूक विमानाचे उड्डाण दाखवण्यात आले. हे विमान जमिनीपासून ५०० फूट उंचीवर उडत होते.