चंद्रशेखर बोबडे

केंद्रातील मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात (२०१५) घोषणा करण्यात आलेल्या स्मार्टसिटी योजनेतील स्मार्ट शहरे महाराष्ट्रात निवड झालेल्या आठपैकी एकाही शहरात आकार घेऊ शकली नाहीत. पुणे, सोलापूर या शहरांमध्ये या योजनेची प्रगती चांगली असली तरी इतर शहरात योजनेचा मोठा टप्पा शिल्लक आहे.

Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये
congress leader rahul gandhi made serious allegations on pm modi in jharkhand
पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जोपासतात; राहुल गांधी यांचा आरोप
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…

हेही वाचा >>>वर्धा : लाजराबुजरा साळींदर रस्त्यावर उतरला, अन्…

केंद्र सरकारने २५ जून २०१५ मध्ये स्मार्टसिटी मिशन (एससीएम) योजना जाहीर केली होती. त्यासाठी जानेवारी २०१६ ते जून २०१८ या काळात स्पर्धात्मक फेऱ्यांद्वारे देशातून १०० शहरांची निवड करण्यात आली होती. यात महाराष्ट्रातील नागपूरसह औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर आणि ठाणे या आठ शहरांचा समावेश होता.

केंद्रीय नगर विकास खात्याच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील शहरांसाठी पाच वर्षात १८ हजार ३८५ कोटी रुपयांच्या (केंद्राचा हिस्सा २९४० कोटी) २९२ योजना सुरू करण्यात आल्या. त्यापैकी ७ हजार ५७५ कोटींच्या २१४ योजना पूर्ण झाल्या. ७८ योजना (किंमत १० हजार ९१० कोटी) अद्याप पूर्ण व्हायच्या आहेत.

हेही वाचा >>>कौतुकास्पद ! आंतरराष्ट्रीय अलामा अब्याकस स्पर्धेत चंद्रपूरचा स्पंदन मानकर जगात दुसरा

पुणे, सोलापूर या दोन शहराची कामे अंतिम टप्प्यात असली तरी इतर शहरांना अजून बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. नागपूर, कल्याण डोंबिवली या महापालिकांमध्ये स्मार्ट सिटी योजनेची स्थिती अत्यंत संथ आहे. नागपूरमध्ये भूसंपादन व अन्य कामामुळे काम थांबले आहे. योजनेला जून २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, या काळातही या योजना पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. करोनामध्ये गेलेली दोन वर्षे, भूसंपादन आणि अन्य कारणांमुळे नागपूरमध्ये या योजनेच्या कामाला फटका बसला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती
शहर योजना पूर्ण

नागपूर १८ ०५
औरंगाबाद ४२ ३१

कल्याण-डोंबीवली १८ ०८
नासिक ५० ३९

चिंचवड २५ १६
सोलापूर ४९ ४२

पुणे ४८ ४५
ठाणे ४२ २८