नागपूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने सामान्य ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लावणार नसल्याची घोषणा केली होती. परंतु महावितरणतर्फे आता नादुरुस्त मीटरला बदलून तेथे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जात आहेत. नवीन जोडणीही स्मार्ट मीटरनेच दिली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वीज देयक थकवणाऱ्या, वीज चोरी करणाऱ्यांवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने ‘स्मार्ट प्रीपेड वीज मीटर’ योजना आणली. महाराष्ट्रातही महावितरणने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी २७ हजार कोटींचे काम विविध कंपन्यांना दिले. परंतु, राज्यभरातील ग्राहक संघटना, वीज कामगार संघटना, राजकीय पक्षांनी या विरोधात आंदोलन पुकारले. त्यामुळे तत्कालीन सरकारने स्मार्ट मीटर सामान्य ग्राहकांकडे लागणार नाही, अशी घोषणा विधानसभेत केली. परंतु, आता प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेच्या ग्राहकांकडेही हे मीटर लावणे सुरू झाले आहे. सोबतच नादुरुस्त मीटर बदलताना व नवीन जोडणी देतानाही हेच मीटर दिले जात आहेत.
हेही वाचा – VIDEO : कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी अडवला वाघाचा रस्ता, शिक्षा मात्र…
अदानी इलेक्ट्रिकलला मोठे कंत्राट
पुणे व बारामती परिमंडळात ५२ लाख ४५ हजार ९१७ मीटर्स आणि भांडूप, कल्याण व कोकण परिमंडळात सात हजार ५९४ कोटी रुपये खर्चून ६३ लाख ४४ हजार ६६ मीटर्स लावण्याचे कंत्राट महावितरणने ‘अदानी इलेक्ट्रिकल’ला दिले आहे. नाशिक, जळगाव, लातूर, नांदेड व औरंगाबाद परिमंडळात ५६ लाख स्मार्ट मीटरचे काम नॅशनल कंस्ट्रक्शन कंपनी (एनसीसी) कंपनीला, चंद्रपूर, गोंदिया व नागपूर परिमंडळात ३० लाख मीटर बसवण्याचे काम ‘माँटेकार्लो’ कंपनीला तर अकोला व अमरावती परिमंडळात २१ लाख मीटर बसवण्याचे काम ‘जीनस पॉवर’ कंपनीला देण्यात आले आहे.
राज्यात लक्षावधी मीटर नादुरुस्त
१० ऑगस्ट २०२३ च्या आकडेवारीनुसार, राज्यात १० लाख ९७ हजार ४५६ मीटर नादुरुस्त होते. त्यापैकी सर्वाधिक ३ लाख ६४ हजार ११२ नादुरुस्त मीटर कोकण विभागात तर छत्रपती संभाजीनगर विभागात ३ लाख ५ हजार ७४२ मीटर, नागपूर विभागात २ लाख ६६ हजार ८६१, पुणे विभागात १ लाख ६० हजार ७१३ मीटर होते. प्रत्यक्षात ही संख्या त्याहून जास्त म्हणजे २० लाखांच्या जवळपास असल्याची सूत्रांची माहिती आहे.
अधिकारी काय म्हणतात?
स्मार्ट प्रीपेड मीटरबाबत प्रतिक्रिया मिळवण्याबाबत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. जनसंपर्क विभागाने बोलणे टाळले. महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक म्हणाले, स्मार्ट प्रीपेड मीटर ग्राहकांकडे लावले जात नाहीत. या मीटरबाबत महावितरणने नवीन काही निर्णय घेतला का याची कल्पना नाही.
जनतेची फसवणूक
“विधानसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेत तत्कालीन ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लागणार नसल्याची घोषणा केली होती. त्यानंतरही राज्यात नादुरुस्त मीटर, नवीन जोडणी दरम्यान स्मार्ट प्रीपेड मीटर लावले जात आहेत. त्याला आमचा तीव्र विरोध आहे. या प्रश्नावर आंदोलन केले जाईल.” – कृष्णा भोयर, सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन.