नागपूर : दिल्लीहून नागपूकडे येत असलेल्या तेलंगणा एक्सप्रेसमच्या पँट्रीकारधून अचानक धूर निघाल्याने येथे काम करणारे कर्मचारी आणि प्रवासी भयिभत झाले. त्यांनी नियंत्रण कक्षाला कळवले आणि पुढील स्थानकावर गाडी थांबवण्यात आली. परंतु ही आग नव्हती तर अत्याधिक घर्षणामुळे ब्रेक ब्लॉक जळल्याने धूर निघत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१२७२४ नवी दिल्ली-हैदराबाद तेलंगणा एक्सप्रेस आमला ते नागपूर मार्गावरील पांढुर्णा-दरिमेटा दरम्यान होती. यावेळी अचनाक पँट्रीकारच्या (धावत्या गाडातील स्वयंपाकघर) चाकातून धूर निघत असल्याचे दिसून आले. .हे बघून आग लागली की काय असे कर्मचारी आणि प्रवाशांना वाटले.त्यानंतर ही गाडी पुढील स्थानक दरिमेटा येथे थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीत ही आग नव्हती तर पँट्री कारमध्ये ब्रेक बाइंडिंग झाले होते. गाडीतील कर्मचाऱ्यांनी ब्रेक बाइंडिंग मोकळे केले आणि नागपूरकडे निघाली. या घटनेमुळे ही गाडी अर्धा (१० ते १०.३०) तास खोळंबली होती.