दुबईतून हातोडा आणि छन्नीच्या स्वरूपात सोने तस्करी करून नागपुरात आणणाऱ्या गोरखपूरच्या एका व्यक्तीला नागपुरात तिघांनी पाठलाग करून लुटले. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी तिघांना अटक केली.राहुल यादव (आजमगढ), अक्रम मलिक (नागोर, राजस्थान), ईरशाद खान (नागोर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ३३६ ग्रॅम सोने जप्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> गडचिरोली: नरभक्षी वाघाने घेतला पुन्हा एक बळी ; उसेगाव परिक्षेत्रातील घटना

गेल्या ५ सप्टेंबरला गोरखपूरचा एक मजूर दुबईवरून आला. त्याला दुबईतील एका व्यक्तीने एक बॅग दिली होती. ती बॅग त्याने नागपूर विमानतळावर आलेल्या राजस्थानमधील एका व्यक्तीला दिली. तो व्यक्ती गणेशपेठमधील एका लॉजमध्ये जात होता. राहुल यादव, अक्रम मलिक आणि ईरशाद खान यांनी त्याचा पाठलाग करून ती बॅग हिसकावून नेली. याप्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गणेशपेठ पोलिसांनी या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून बॅग हस्तगत करून ३३६ ग्रॅम सोने जप्त केले. त्या बॅगमध्ये असलेल्या हातोडा आणि छन्नीत सोने आढळले, हे विशेष.