नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली. उन्हाचा तडाखा असल्याने लोकांची मतदानासाठी लगबग देखील सुरू झाली.मात्र थोडा वेळ होत नाही तोच अचानक एका मतदान केंद्रावर सापाने प्रवेश केला आणि एकच गोंधळ उडाला.
केडीके महाविद्यालयातील लोकसभा निवडणुकीच्या मतदान कक्ष क्र पाचच्या बाहेर सकाळी दहा वाजताच्या सुमारास सापाने प्रवेश केला. साप दिसताच एकच गोंधळ उडाला. यावेळी मोहनीश मोहाडीकर या युवकाने मतदानासाठी गेलेल्या नितीश यांना फोन केला.
हेही वाचा…तुतारी टोचाची की फुकाची? मतदारांना पडलेला प्रश्न अन् त्यावर शोधले मग ‘हे’ उत्तर
वाइल्डलाइफ वेलफेअर सोसायटीचे सचिव नितीश भांदककर यांना सांगितले. माहिती मिळताच नितीश भांदककर, रूपचंद वैद्य, लकी खलोडे हे मतदान केंद्रावर पोहोचले मतदान कक्षाच्या बाहेरील झुडपांमध्ये सुमारे अडीच फूट लांबीचा विषारी साप आढळून आला असता, त्याला पकडून जंगलात सोडण्यात आले.