लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भंडारा: विद्युत पुरवठा करणाऱ्या नदीवरील डीपीतील जनित्रात भला मोठा साप अडकून पडल्याने विद्यूत पुरवठा बंद होऊन तब्बल दोन दिवस बारव्हा ग्रामवासीयांना नळाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले.

लाखांदूर तालुक्यातील चुलबंद नदीतीरावरील मरेमाव घाटावर बारव्हा येथील नळ योजनेचे मोठे जलकुंभ आहे. बाजूलाच विद्यूत जनित्र आहे. दोन दिवसांपासून नळाला पाणी का येत नाहीये म्हणून ग्रा. प. पाणीपुरवठा कर्मचारी प्रदीप झोडे यांनी डीपी वरील डिओची तपासणी करण्याकरिता गेले असता डीपीच्या जनित्रात भलामोठा साप अडकून पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. याची माहिती त्यांनी विद्युत विभाग कर्मचारी यांना दिली.

आणखी वाचा- भंडारा: प्रसुती झालेल्या महिलेचा वीस तासाच्या आत अचानक मृत्यू

मागील दोन दिवसापासून परिसरात पावसामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाण्याची टाकी भरली जात नाही. त्यामुळे भर पावसातही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snake stuck in electric transformer water shut off for two days ksn 82 mrj
Show comments