नागपूर: महावितरणच्या गो ग्रीन योजनेत विदर्भातील ५४ हजार २७५ ग्राहकांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे या ग्राहकांना छापील वीज देयकाच्या एवजी ईमेलवर वीज देयक मिळत असल्याने महिन्याला प्रति देयक १० रुपयांची सवलत महावितरणकडून मिळते.
महावितरणच्या गो ग्रीन योजनेत ग्राहकांनी छापील कागदी देयकाच्या एवजी ई- मेलने येणाऱ्या पेपरलेस बिलाचा पर्याय स्वीकारला तर त्यांना कागदी देयक पाठविणे बंद केले जाते. त्यामुळे ग्राहकाला प्रत्येक देयकात दहा रुपये सवलत मिळते.
हेही वाचा… अखेर कंत्राटी भरती रद्दचा शासन निर्णय जाहीर, सर्व कंपन्यांसोबतचे करार रद्द; पुढे अशी भरती होणार…
विदर्भातील नागपूर परिमंडळातील १९ हजार ७२ ग्राहक, अकोला परिमंडळातील १३ हजार २५१, अमरावती परिमंडळातील १२ हजार ७९, चंद्रपूर परिमंडळातील ५ हजार १३५ तर गोंदीया परिमंडळातील ४ हजार ७३८ ग्राहकांनी योजनेत स्वत:चा समावेश केला आहे. त्यामुळे या ग्राहकांना महिन्याला १० रुपये सवलत मिळत आहे. सोबत छापील देयके कमी होऊन कागदाचा वापर कमी होऊन पर्यावरन संरक्षण होत असल्याचे महावितरणचे म्हणने आहे.