यवतमाळ: गरीब निराधार लोक गल्लीबोळात कुठेतरी आसरा घेऊन वास्तव्य करतात. अशा लोकांना हक्काचे घर हवे आहे, मात्र या गरीब आणि वृद्धांना घर कोण देणार? घाटंजी येथील सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांच्या रसिकाश्रय संस्थेने निराश्रीत असलेल्या दोन महिलांना चक्क घर बांधून दिले.

सुनंदा सोनवणे आणि वच्छला पेटेवार यांना नुकताच हक्काचा निवारा मिळाला. सुनंदा शरीराने व्यंग असून विधवा आहे. सहा वर्षाआधी पतीने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यावेळेस मुलगा छोटा होता. कष्ट करून जगण्याची शक्ती तिच्यात नव्हती. सुनंदा एकटी पडली कुठल्याही नातेवाईकांनी तिला आधार दिला नाही. स्वतःच राहतं कच्च घर पडलं, मात्र ते बांधण्यासाठी तिच्याकडे पैसेही नव्हते. म्हणून ती स्वतःच घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाऊन निरश्रीत म्हणून राहू लागली.

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

हेही वाचा… विदर्भातील पहिला ओडीएफ प्लस तालुका घोषित, वाचा सविस्तर

एकदा महेश पवार यांच्या निराधार संघटनेच्या बैठकीला आली आणि राहायला घर नसल्याची व्यथा महेश पवार यांच्या समोर मांडली. क्षणाचाही विलंब न करता रसिकाश्रयची टीम कामाला लागली आणि तिचे घर उभे करून दिले. आज दोघे मायलेक आनंदाने त्या घरात वास्तव्य करत आहे.

वच्छला पेटेवार या ७६ वर्षांच्या वृद्ध महिला पडक्या झोपडीत राहत होत्या. मुलगा आहे पण तो सांभाळ करत नाही. म्हणून अतिक्रमणच्या जागेवर एक झोपडी बांधून गेल्या १० वर्षांपासून ती राहत आहे. कुणीतरी जेवायला देतो तेव्हा तिचे पोट भरते. पडकी झोपडी कधी अंगावर पडेल याचा नेम नाही. तिचेही घर रसिकाश्रयने उभे करून दिले.

हेही वाचा… अंधूक प्रकाशामुळे नागपूरऐवजी विमान वळविले मुंबईकडे

दोन्ही घर उभे झाले आणि थाटामाटात उद्घाटन सोहळा पार पडला. घाटंजीचे भरत तायडे, विठ्ठल बिजेवार यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. घराचे पूजन करून वच्‍छलाबाई आणि सुनंदा यांना पेढा भरवण्यात आला, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी दिली.