वर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती विविध उपक्रमांतून समाज प्रबोधन करीत असते. वर्धा जिल्हा दारुबंदी जिल्हा म्हणून घोषित असला तरी या जिल्ह्यात दारूचे पाट वाहत असल्याची बाब नित्याचीच. त्या अनुषंगाने अवैध दारुविक्री ३१ डिसेंबर व १ जानेवारीला जोमात होते. याच दिवशी पंधरा लाखाची दारू जप्त करण्यात आली. हे टाळावे म्हणून महाराष्ट्र अंनिसने एक ग्लास दुधाचा ही मोहीम राबविली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बजाज चौकात द दारूचा नव्हे तर द दुधाचा, असे फलक लागले. दूध वाटप करण्यात आले. दूध वाटपप्रसंगी बोलताना शहर ठाणेदार धनाजी जळक म्हणाले की, व्यसन ही कीड असून तरुण पिढी वाया जात आहे. पोलिसांवर यामुळे ताण वाढत आहे. असे प्रबोधन आवश्यक असल्याचे जळक म्हणाले. यावेळी खाणार नाही गुटखा, पिणार नाही दारू, एक ग्लास दुधाचा नव्हे दारूचा व अन्य नारे देण्यात आले.

हेही वाचा – ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे हवामानात बदल, महाराष्ट्रावर पावसाचे सावट

हेही वाचा – गजानन महाराजांच्या दर्शनाने नववर्षाची सुरुवात, हजारो भाविकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन; संतनगरी शेगावात तीन दिवस…

यावेळी ज्येष्ठ नागरिक सुधाकर मेहेरे, अनिसचे गजेंद्र सूरकार, राजेश डेहनकर, डॉ. हरीश पेटकर, डॉ. मंजुषा देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. आयोजनात अरुण भोसले, प्रा. प्रीतेश म्हैसकर, सुनील धाले, निखिल जवादे, विजय भूजाडे, शंकर श्रीरामे, अदिती ढोरे, शुभांगी ढोरे, ज्योती भोसले, तनु वऱ्हाडे, धीरज खुरद, अनिकेत खेडकर, पाल, सचिन गीत, सूरज भगत यांनी योगदान दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social awareness against alcohol in wardha by maharashtra superstition eradication committee pmd 64 ssb
Show comments