लोकसत्ता टीम

चंद्रपूर : महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेटाळा तथा मीराबाई कांबळे नर्सिंग कॉलेज, ब्रम्हपूरी, मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग, घोडपेठ, नवजीवन नर्सिंग स्कुल, चंद्रपूर या तीन नर्सिग कॉलेजसह एकूण नऊ कॉलेजकडे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे ५०० पेक्षा अधिक अर्ज प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विद्यार्थी शिष्यवृतीला मुकल्यास संबंधित महाविद्यालयाला जबाबदार धरले जाणार आहे. तसेच अशा दोषी महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार असे समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.

Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Thane district, 578 children came under education stream, Survey of out of school children
ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात
IFS, UPSC, girl opt IFS, IAS IPS, Vidushi Singh,
आयएएस, आयपीएसचा पर्याय सोडून आजीआजोबांच्या स्वप्नपूर्तीसाठी आयएफएसची निवड

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावर शिष्यवृतीच्या २०२३-२४ या सत्रासाठी नव्याने अर्ज भरण्याची ऑनलाईन सुविधा बंद करण्यात आली आहे. असे असतांनाही ५०० पेक्षा जास्त अर्ज महाविद्यालयाकडे प्रलंबित आहेत. ही अत्यंत धक्कादायक व गंभीर बाब असून विद्यार्थी शिष्यवृतीला मुकल्यास महाविद्यालयास जबाबदार धरले जाणार आहे. तसेच अशा महाविद्यालयांवर कारवाईसुध्दा केली जाणार आहे, असे समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा-नागपूरकरांचा सवाल? आयुक्त साहेब, ड्रग्स तस्करांची साखळी कधी तुटेल?

प्रलंबित अर्ज असलेल्या महाविद्यालयांमध्ये जिल्ह्यातील नऊ कॉलेजचा समावेश आहे. हिस्लॉप ज्यु.कॉलेज, नगीनाबाग, चंद्रपूर ८ अर्ज प्रलंबित आहेत. सम्राट अशोक ज्यु.कॉलेज, चिचपल्ली ८ अर्ज, नवजीवन नर्सिंग स्कुल, चंद्रपूर १४ अर्ज, मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग घोडपेठ १६ अर्ज, मीराबाई कांबळे नर्सिंग कॉलेज, ब्रम्हपूरी ७८ अर्ज, आर्ट, कॉमर्स कॉलेज, गोंडपिपरी ६ अर्ज, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेटाळा ३१ अर्ज, गव्हर्नमेंट आयटीआय, ब्रम्हपूरी ९ अर्ज, महिला बीएड कॉलेज, चंद्रपूर ८ अर्ज. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून संयुक्तपणे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज भरण्यासाठी वेळेावेळी मुदतवाढ देण्यात आली.

आणखी वाचा-महायुतीमध्ये बाळापूरवरून ओढाताण

आता २०२३-२४ मधील प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरिता अंतिम मुदतवाढ निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार प्रलंबित अर्ज महाविद्यालयास सादर करण्यासाठी २० ऑगस्ट ही मुदत आहे, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, यांनी कळविले आहे. विशेष म्हणजे या सर्व महाविद्यालयांना समाज कल्याण विभागाकडे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाबाबत वारंवार सूचना देण्यात आलेली आहे. मात्र महाविद्यालयांनी समाज कल्याण विभागाच्या या सूचनांकडे कानाडोळा केला. मात्र आता सर्व नऊ महाविद्यालयांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. प्रलंबित अर्ज २० ऑगस्ट पर्यत निकाला काढले नाही तर संबंधित महाविद्यालयांची मान्यता देखील रद्द केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.