अकोला: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजसेवक गजानन हरणे यांनी सलग सहा दिवस अन्नत्याग्र सत्याग्रह केला. अखेर त्यांनी शुक्रवारी आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत बालकांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडले.
जिल्ह्यातील विविध गावांमधून आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. समाजातील विविध संघटनांकडून लाक्षणिक उपोषण केले जात होते. गोंधळ, मुंडन, भजन आदींच्या माध्यमातूल लक्ष वेधण्याचे प्रयत्न आंदोलकांनी केले. विविध राजकीय पक्षांच्या नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी आंदोलनाला भेटी दिल्या. १५० च्यावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन गजानन हरणे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला व मराठा आरक्षणाला पाठिंबा नोंदविला होता.
हेही वाचा… नागपूर: शाळेतील खड्ड्यात पडून मृत्यू, शेकडो पालकांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी सारंगाला अखेरचा निरोप
शासनाने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास अकोल्यात पुन्हा तीव्र लढा उभारण्यात येईल, असा इशारा गजानन हरणे यांनी दिला. संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक गावात जाऊन मराठा आरक्षण जनजागृती अभियान २ जानेवारीपर्यंत राबविण्याचा मानस गजानन हरणे यांनी व्यक्त केला.