अकोला: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजसेवक गजानन हरणेंनी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला. या आंदोलनाला विविध समाजाने पाठिंबा दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषणे झाली. गेल्या चार दिवसापासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करीत आहे. शासनाने त्यांना दिलेले आश्वासन पाळले नसल्यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण झाला. आरक्षणाच्या मागणीला व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समाजसेवक गजानन हरणे यांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला.
हेही वाचा… राज्यासह देशात गुलाबी थंडी, किमान तापमानात घट; नोव्हेंबरमध्ये धुकेही वाढणार
शासनाने तात्काळ मागणी मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रश्नावर मराठा तरुणांनी आत्महत्या करण्यापेक्षा संबंधित जिल्हाधिकारी, तहसील, ग्रामपंचायतसमोर आमरण उपोषण, साखळी उपोषण सुरू करून शासनास जागृत करावे, असे आवाहन हरणे यांनी केले आहे.