चंद्रपूर : नागपूर -चंद्रपूर या रस्त्यावरून प्रवास करीत असताना कार पुलाचे कठडे तोडून नाल्यात कोसळून पेट घेतल्याने आगीत होरपळून एका सैनिकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी भद्रावती शहरानजीक असलेल्या कोंढा नाल्यात उघडकीस आली.

या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व अर्धवट जळालेला मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Container hits eight vehicles including police car on Chakan Shikrapur road Pune
Video: चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Mumbai Nashik highway accident near Gogethar killed three including couple from Amalner
अमळनेरमधील दाम्पत्याचा शहापूरजवळील अपघातात मृत्यू
tiger ran away from farmer
वाघ समोर उभा ठाकला, पण शेतकऱ्याने असे काही केले की पळून गेला; गडचिरोलीतील…
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी

हेही वाचा…यवतमाळ: पोहायचा मोह जिवावर बेतला! वणीतील तीन तरुण वर्धा नदीत बुडाले

दिपक बघेल (३५)राहणार मल्हारी बाबा सोसायटी भद्रावती असे मृताचे नाव आहे. दिपक हा जामनगर येथे आर्मीमध्ये कार्यरत होता. या पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मध्यरात्रीनंतर (२३ बी एच ६८५५सी) या क्रमांकाची मारुती इग्नेश ही कार नागपूर कडून भद्रावती कडे येत असताना ती कोंढा नाल्याच्या पुलावरील कठड्याला धडकून नाल्यात कोसळली. कोसळल्यावर या कारने पेट घेतला. कार चालक दिपक यांनी कार मधून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला बाहेर निघता न आल्याने कारला लागलेल्या आगीत त्याचा होरपळून मृत्यू झाला. सदर घटनेचा तपास ठाणेदार बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.

Story img Loader