लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी निघालेल्या सैनिकांना रेल्वेतील वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त असल्याने आणि विजेचा कमी दाब असल्याने तब्बल साडेअकरा तास नागपुरात अडकून पडावे लागले.

आणखी वाचा- नागपूर: मोठ्या बहिणीच्या रागाने तीन बहिणींचे घरातून पलायन; मध्यप्रदेशातून मुलींना पोलिसांनी घेतले ताब्यात

ही विशेष गाडी सैनिकांना घेऊन सिकंदराबाद येथून जम्मूकडे जात होती. ही गाडी आज सकाळी ६.५८ वाजता नागपुरात स्थानकावर आली. वातानुकूलित डब्यातील यंत्रणा नादुरुस्त आणि इतर डब्यात वीज दाब कमी असल्याची बाब सैन्यदलातील अधिकाऱ्याने रेल्वे प्रशासनाला कळवली. त्यानंतर दुरुस्ती काम सुरू झाले. सव्वाअकरा वाजेपर्यंत ही गाडी फलाट क्रमांक १ वर उभी होती. परंतु बिघाड मोठा असल्याने रेल्वे यार्डमध्ये नेण्यात आली. सायंकाळी ६.२५ वाजता गाडी पुढील प्रवासाला रवाना करण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soldiers on their way to jammu got stuck in nagpur due to a railway fault rbt 74 mrj
Show comments