नागपूर : शहरातील काही पोलीस ठाणे, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेतील काही वादग्रस्त आणि बहुचर्चित पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा सपाटा पोलीस आयुक्तांनी लावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलीस आयुक्तांच्या डोळ्यात धुळफेक करून गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करणाऱ्यांची थेट पोलीस मुख्यालयात बदली करण्यात येत आहे. पोलीस विभागाची डागाळलेली प्रतिमा उजाळण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.

हेही वाचा – वर्धा : ‘समान काम समान वेतन अन्यथा राज्यव्यापी कामबंद आंदोलन’; नर्सेस संघटनेचा इशारा

गेल्या १० ते १५ वर्षांपासून अनेक पोलीस कर्मचारी वाहतूक शाखेतील ‘मलाईदार’ पदावर कार्यरत होते. अधिकारी कोणताही आला की त्यांना ‘आवक-जावक’ समजून सांगून आपली जागा पक्की करीत होते. काही वाहतूक पोलिसांनी तर बदलीच्या यादीत नाव येऊ नये म्हणून थेट लिपिकांना हाताशी धरून तारखेत खोडाखोड करून पोलीस आयुक्तांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला होता. त्या पाचही वाहतूक कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली. तसेच चालन करण्याची ‘पॉस डिवाईस’ देण्यासाठी दररोज ७०० ते ९०० रुपये घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही पोलीस मुख्यालयाचा रस्ता मोकळा केला आहे.