नागपूर : महाराष्ट्रात येत्या चार-पाच दिवसांत मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

मुंबई, पुण्यासह रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली या भागांना ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, जालना, अकोला, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Randeep Surjewala promised Rs 7000 per quintal for soybeans if Maha Vikas Aghadi wins
सत्तेत आल्यास सोयाबीनला ७ हजार रुपये हमीभाव…रणदीप सिंग सुरजेवाला यांची घोषणा…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Prime Minister Narendra Modis announcement to give guaranteed price of 6 thousand for soybeans
सोयाबीनला सहा हजारांचा हमीभाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
farmers anger continues in 70 constituencies over soybean msp
७० मतदारसंघांत सोयाबीन ‘रोष’
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला

हेही वाचा – विदर्भातील पंढरपुरात सापडले ३५० वर्षांपूर्वीचे प्राचीन कुंड

राज्यात मान्सून सक्रिय झाला असून राज्याच्या विविध भागांत चांगला पाऊस झाला आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात आधी रिमझिम बरसणाऱ्या पावसाने नंतर चांगलाच जोर धरला. पुणे जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला. लातूर, सांगली जिल्ह्यातही संततधार सुरू आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यातदेखील मूसळधार पावसाने ठाण मांडले आहे.

हेही वाचा – राणा दाम्पत्याच्या राजकीय महत्वाकांक्षेला भाजपमधूनच आव्हान?

नागपूर जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहे. तर महाराष्ट्रातील काही भागांत आज मूसळधार पावसाचा इशारादेखील देण्यात आला आहे.