लोकसत्ता टीम

नागपूर: मातृत्व माणसालाच लाभलं, मातृत्व जाण म्हणजे माणसालाच, असं कुठंय! किंबहुना माणसांपेक्षा मातृत्वाची अधिक तीव्र भावना ही प्राण्यांमध्ये असते.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघीनींनी हे कित्येकदा दाखवून दिलंय. ताडोबात येणारे पर्यटक गेल्या काही महिन्यांपासून “बबली” या वाघिणीच्या मातृत्वाचे साक्षीदार ठरले आहेत.

tigress babali
डोंबिवली येथील वन्यजीवप्रेमी डॉ. राहुल महादार यांनी तिचे हे मातृत्व अलगद कॅमेऱ्यात टिपले आहे.

“बबली” म्हणजे ताडोबाचा अलिझंझा बफर क्षेत्राची राणी. काही महिन्यांपूर्वी तिला मातृत्व लाभले आणि गोंडस बछड्याना तिने जन्म दिला. त्यांच्यासोबत ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. उन्हाळ्यात गर्मीपासून सुटका करण्यासाठी बछडे पानवठ्यात डुंबतात, तेव्हा त्यांची मस्ती ती डोळ्यात साठवते, पण त्याचवेळी काळजीपूर्वक त्यांच्यावर लक्ष देखील ठेवून असते. तर बरेचदा या मायलेकांचा रस्त्यावरच”रोड शो” सुरू असतो. तेव्हाही तिच्या नजरेत बछड्यांची सुरक्षितता दिसते.

तिच्या मातृत्वाचा पावलोपावली प्रत्यय येतो. डोंबिवली येथील वन्यजीवप्रेमी डॉ. राहुल महादार यांनी तिचे हे मातृत्व अलगद कॅमेऱ्यात टिपले आहे.

Story img Loader