नागपूर : सोलापूर विभागातील दौड ते मनमाडदरम्यान दुसरा रेल्वे मार्ग तयार करण्यात असून त्यासाठी नॉन-इंटरलॉकिंग करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एक्सप्रेस, गरीबरथ एक्सप्रेस आणि नागपूर ते पुणे एक्सप्रेस या रेल्वेगाड्या २१ ते २३ मार्चला रद्द करण्यात येणार आहेत.
हेही वाचा – धक्कादायक! समाज माध्यमावर बनावट खाते उघडून बेरोजगार मुलींशी अश्लील चाळे
हेही वाचा – जी २० शिखर परिषदेसाठी नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे रूप पालट
मध्य रेल्वे सोलापूर विभाग दौंड ते मनमाडदरम्यान बेलापूर, चितळी आणि पुणतांबा स्थानकांदरम्यान नॉन- इंटरलॉकिंग काम सुरू करणार आहे. ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस (२१ आणि २२ मार्च), ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस २२ आणि २३ मार्च), १२११४ नागपूर-पुणे गरीबरथ एक्सप्रेस (२१ मार्च), १२११३ पुणे नागपूर गरिबरथ एक्सप्रेस (२२ मार्च), १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस (२२ मार्च), १२१३५ पुणे-नागपूर एक्सप्रेस (२३ मार्च) रद्द करण्यात आल्या आहेत. १२१२९ पुणे – हावडा आझाद हिंद एक्सप्रेस (२२ मार्च) दौड, वाडी, सिकंदराबाद, बल्लारशाह मार्गे नागपूरला येईल. आणि १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस (२० व २१ मार्च) नागपूरहून बल्लारशाह, सिकंदराबाद, वाडी, दौड मार्ग पुण्याला जाईल.