नागपूर : दक्षिण – पूर्व – मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात राजनांदगाव ते कळमना दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे मार्गाला कामठी रेल्वे स्थानकाला जोडण्यात येत असल्याने काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तिसरा रेल्वे मार्ग जोडण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग २२ ते २५ जुलै राहणार आहे.
कामठी येथील कामासाठी इतवारी येथून सुटणाऱ्या आणि येथे येणाऱ्या काही गाड्यांना चार दिवस रद्द करण्यात येत आहेत. यामध्ये ०८७५६ इतवारी-रामटेक मेमू पॅसेंजर (२२ ते २५ जुलै), ०८७५१ रामटेक- इतवारी मेमू पॅसेंजर (२२ ते २५ जुलै), ०८७५४ इतवारी-रामटेक मेमू पॅसेंजर (२२ ते २५ जुलै), ०८७५५ रामटेक- इतवारी मेमू पॅसेंजर (२२ ते २५ जुलै), १८२३९कोरबा-इतवारी एक्सप्रेस (२२ ते २४ जुलै), १८२४० इतवारी-कोरबा एक्सप्रेस, १२८५५ बिलासपूर-इतवारी इंटरसिटी एक्सप्रेस (२२ ते २४ जुलै), १५८५६ इतवारी ते बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेस (२३ ते २५ जुलै), ०८७६७ रायपूर-इतवारी मेमू पॅसेंजर, ०८७६८ इतवारी-रायपूर मेमू पॅसेंजर, ०८७११ डोंगरगड-गोंदिया मेमू पॅसेंजर, ०८७१३ गोंदिया-इतवारी मेमू पॅसेंजर, ०८७१५ बालाघाट-इतवारी मेमू पॅसेंजर, ०८७१४ इतवारी-बालाघाट मेमू पॅसेंजर, ०८७१६ इतवारी- गोंदिया पॅसेंजर, ०८७१२ गोंदिया- बालाघाट पॅसेंजर, ०८७१२ गोंदिया-डोंगरगड मेमू पॅसेंजर (२२ ते २५ जुलै) रद्द करण्यात येत आहेत.