लोकसत्ता टीम
वर्धा : वर्धा जिल्ह्यात चारही मतदारसंघात एकाच पक्षाचा विजय होण्याचा अलिकडच्या काळातील विक्रम, सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम, सलग चारवेळा पराभूत होण्याचा विक्रम, एका मतदारसंघात हॅटट्रिकचा विक्रम, माजी आमदार दोन हजार मतांमध्ये आटोपण्याचा विक्रम अशी काही नोंद झाली आहे.
आर्वीत भाजपचे सुमित वानखेडे ३९ हजार ५७४ मतांनी विजयी झाले. एव्हढ्या फरकाने विजयी होणारे ते पहिलेच आमदार अलिकडच्या काळात ठरले आहे. त्यांना १०१३९७, आघाडीच्या मयुरा काळे यांना ६१८२३ तर प्रहारचे जय बेलखडे यांना १३२५२ मते पडली. हा वानखेडे यांचा मोठ्या फरकातील विजय समजल्या जात आहे.
आणखी वाचा-‘अकोला पश्चिम’चा भाजपचा बालेकिल्ला ढासळला
वर्ध्यात डॉ. पंकज भोयर यांना ९२०६७ तर काँग्रेसीचे शेखर शेंडे यांना ८४५९७ व अपक्ष डॉ. सचिन पावडे यांना ८७२८ मते मिळाली. भोयर हे ७४७० मतांनी विजयी झाले आहेत. देवळीत राजेश बकाने यांना ९०३१९, काँग्रेसचे रणजित कांबळे यांना ८१०११ व अपक्ष किरण ठाकरे यांना ५९२७ मते प्राप्त झाली असून भाजपचे राजेश बकाने हे ९३०८ मतांनी विजयी झालेत. हिंगणघाटला भाजपचे समीर कुणावार हे ३००९४ मतांनी विजयी झाले. त्यांना ११४५७८, आघाडीचे अतुल वांदिले यांना ८४४८४, वंचितचे अश्विन तावडे यांना २८६५ व माजी आमदार राजू तिमांडे यांना २२५१ मतेच मिळू शकली.
या स्वरूपातील मतदान हे विविध अर्थाने विक्रमी ठरले. वानखेडे हे सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम करणारे ठरल्याचे अभ्यासक सांगतात. माजी आमदार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडखोर राजू तिमांडे चवथ्या क्रमांकावर गेले. गत निवडणुकीत ते दुसऱ्या क्रमांकावर होते. राष्ट्रीय पक्षातर्फे सलग चार वेळा पराभूत होणारे शेखर शेंडे हे पहिले उमेदवार ठरले आहे. हिंगणघाट येथे विजयी होणारे समीर कुणावार हे या मतदारसंघातील हॅटट्रिक प्राप्त करणारे पहिले आमदार ठरले आहे.
आणखी वाचा-रिसोडमध्ये काँग्रेसचे अमित झनक यांचा विजयी चौकार, वाशीम व कारंजामध्ये नव्यांना संधी
एका जिल्ह्यातील चारही मतदारसंघ तसेच एका लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघात विजयी होणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला आहे. सर्व मतदारसंघात थेट दुहेरी लढत झाल्याची टक्केवारी मतदानतून दिसून येते. सलग चार वेळा दुसरा क्रमांक घेणारे शेखर शेंडे हे पहिलेच असे काँग्रेस उमेदवार ठरले आहे.