भंडारा : एकीकडे बेरोजगारी वाढत असताना आणि डी.एड, बी.एड केलेले तरूण नोकरीच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांअभावी सरकारी शाळा ओस पडत चालल्या आहेत. पवनी तालुक्यातील कोंढा केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोमनाळा.बूज येथेही शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. शाळेला पटसंख्येचे निकषानुसार लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्यात येईल असा ईशारा संतप्त पालक व शाळा व्यवस्थापन समितीने गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोमनाळा बुज येथे १ ते ७ पर्यत वर्ग असून आता एकूण १०६ विद्यार्थी पटावर आहेत. मागील सत्र वर्ष २०२२ – २३ मध्ये ४ शिक्षक व करार पध्दतीवर नियुक्त १ असे एकूण ५ शिक्षक कार्यरत होते. नुकताच झालेल्या आंतरजिल्हा बदलीत शाळेतील ३ शिक्षक बदली होऊन गेल्यानंतर त्यांचे ठिकाणी फक्त एकच शिक्षक नव्याने रूजू झाले असून १ ते ७ वर्ग असलेल्या शाळेत सध्या फक्त दोनच शिक्षक कार्यरत आहेत.
परीणामी शिक्षकांअभावी पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालक आपल्या मुलांना गावातील जिल्हा परिषद शाळेतून काढून इतर खाजगी शाळेत प्रवेश घेण्याचा विचार करत आहेत. शाळा सुरू होऊन दोन पाच दिवस झाले .

Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Thane district, 578 children came under education stream, Survey of out of school children
ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात
loksatta readers feedback
लोकमानस: उतावीळपणा पुन्हा अंगलट!
pro max level backbencher student making bhelpuri while attending lecture video went viral
“मुलांनी तर हद्द केली राव!” वर्गात शिक्षक शिकवत होते अन् मागच्या बाकावर बसून विद्यार्थी करत होते ‘हे’ काम, Video Viral

हेही वाचा >>>बुलढाणा: नाल्याला आलेल्या पुरात बैलगाडीसह तिघे वाहून गेले; दोघे बचावले एक बेपत्ता

मात्र पाचच दिवसात दाखला काढण्यासाठी अनेक अर्ज प्राप्त झाले असून हे असेच सुरू राहीले तर गावची एकमेव असलेली सरकारी शाळा ओस पडेल आणि गरीबांच्या मुलांना शिक्षण घेणे कठीण होईल या भितीने गावातील सुशिक्षित तरुण व पालकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी संतप्त होत शाळेवर मोर्चा काढला आणि “शिक्षक नाही तर शाळाच चालू देणार नाही” अशी भुमिका घेतली. त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीने मध्यस्थी करत लवकरच आवश्यक शिक्षक उपलब्ध केले जातील असा शब्द देत पालकांची समजूत काढली. असे झाले नाही तर आम्ही स्वतःच शाळेला कुलूप बंद करू व शिक्षक उपलब्ध होईस्तोवर आंदोलन करू असा इशारा दिला.

हेही वाचा >>>मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांचा शरद पवारांना पाठिंबा

हा प्रश्न केवळ सोमनाळा.बूज या एकाच शाळेचा प्रश्न नसून जिल्ह्यात अशा अनेक शाळा आता अशा उदासीन धोरणामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने लवकरात लवकर शिक्षक भरती करून यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा.-दिगांबर कुंडलिक वंजारी
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व सामाजिक कार्यकर्ता सोमनाळा