चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत येणाऱ्या सोमनाथ प्रवेश द्वार २२ जुलै रोजी पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. ताडोबा बफर मधील हे १५ वे प्रवेश द्वार आहे. पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) मूल वन परिक्षेत्रातील सोमनाथ येथील बफर झोनमध्ये आणखी एक प्रवेशद्वार जोडणार आहे. २२ जुलै रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या गेटचे उद्घाटन होणार आहे.
बफर झोनमधील हे १५ वे एंट्री गेट असेल, ज्यामुळे ताडोबा देशातील जास्तीत जास्त पर्यटन दरवाजे असलेले व्याघ्र प्रकल्प बनला आहे. ताडोबाच्या . इतर १४ प्रवेश द्वार मधून बफर टुरिझमला मिळालेल्या प्रतिसादाने खूश झालेले स्थानिक ग्रामस्थ सोमनाथमध्ये पर्यटनाची मागणी करत होते.मुल शहरा जवळचे सोमनाथ हे चंद्रपूरपासून ५० किमी अंतरावर आहे. येथे प्रसिद्ध समाज सेवी बाबा आमटे यांचा प्रकल्प देखील आहे. नागपूरहून, नागभीड-सिंदेवाही-मूल मार्गे नवीन प्रवेशद्वार १४६ कि.मी. असेल, तर नागपूरहून वरोरा-भद्रावती-चंद्रपूर-मूल मार्गे २०० किमीपेक्षा जास्त असेल. मुल-चंद्रपूरपासूनचा संपूर्ण भाग जंगलाने व्यापलेला आहे आणि चांगले वन्यजीव आहेत.”वाघ, बिबट्या, अस्वल आणि तृणभक्षी प्राण्यांसह, सोमनाथ येथील मंदिर व धबधबा आकर्षण असेल.
हेही वाचा >>>“चंद्रपूर लोकसभा मतदार संघावर आमदार प्रतिभा धानोरकर यांचा पहिला हक्क”, जिल्हाध्यक्ष धोटे म्हणाले…
हेही वाचा >>>परिवहन विभागाकडून लांब पल्ल्याच्या बस चालकांची मद्य तपासणी; अपघात टाळण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना
ताडोबात कोळसा जंगल लागून आहे. मुल आणि लगतच्या जंगल परिसरातील गावात मनुष्य-प्राणी संघर्ष भडकला आहे. मात्र तरीही येथे सफरीला चांगला प्रतिसाद मिळेल असा अंदाज आहे. जंगल सफारीमुळे मरोडा, पडझरी, आदर्शखेडा, भादुर्णी, उसराळा आणि इतर लहान गावांना सामुदायिक पर्यटन उपक्रमाद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या मार्गाने फायदा होईल. सुरुवातीला येथे चार जिप्सीना प्रवेश दिला जाणार आहे. एकूणच ताडोबात सध्या पर्यटनावर भर दिला जात आहे.