नागपूर : नागपुरातील एका दारूड्या मुलाने याहून पुढे जात लग्न करून देण्याची जिद्द करत चक्क स्वत:च्या जन्मदात्या वडिलांनाच मारहाण केली. यावर कळस म्हणजे त्याने चक्क त्यांना ठार मारण्याचीदेखील धमकी दिली. अखेर वडिलांना मुलाविरोधातच पोलिसांकडे धाव घ्यावी लागली.

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून हा प्रकार ऐकून पोलीसदेखील चक्रावले. सुरेश मोतीराम टाकलीकर (टिमकी) असे ७० वर्षीय दुर्दैवी पित्याचे नाव आहे. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. मोठा मुलगा सचिन (४०) हा एका हॉटेलमध्ये काम करतो व त्याला दारूचे व्यसन आहे. त्याच्या या व्यसनाबाबत शेजारी तसेच नातेवाईकांना माहिती असल्याने त्याचे अद्यापही लग्न झालेले नाही. त्याला कुणीच मुलगी द्यायला तयार होत नाही. यामुळे त्याची चिडचिड वाढली असून लहानसहान गोष्टींवरून तो घरात वाद घालतो.

pappu yadav death threat
“सलमान खान प्रकरणापासून दूर राहा, अन्यथा…”; लॉरेन्स बिष्णोई टोळीची अपक्ष खासदाराला धमकी!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
loksatta chatura Custody Of Infant To Breastfeeding Mother
स्तनपान करणार्‍या अपत्याचा ताबा आईकडेच!
Nagpur Darjeeling girls, Darjeeling girls prostitution Nagpur,
नागपूर : देहव्यापारासाठी हॉटेलमध्ये आणल्या दार्जिलिंगच्या तरुणी
Maternity Benefit Act 1961, maternity benefits, working women,
गर्भधारणा लाभ कायदा हा नोकरीतील कंत्राटापेक्षा वरचढच!
BJP leader son marriage
भाजपा नेत्याच्या घरी येणार पाकिस्तानी सून; नुकताच पार पडला ऑनलाईन विवाह; पाहा VIDEO
Loksatta chaturang article about friendship
सांदीत सापडलेले…! मैत्री
every hundred babies born worldwide 100 do not cry at birth due to oxygen deprivation
बाळ जन्मल्यानंतर रडले नाही… हे आहे गंभीर कारण… बालरोग तज्ज्ञ म्हणतात…

हेही वाचा – लग्नात बेभान होऊन नाचताना मामाला अचानक हृदयविकाराचा झटका

दोन दिवसांअगोदर त्याने लग्नाचा विषय काढला व दारूच्या नशेत वाद घालायला सुरुवात केली. नेमक्या त्याच वेळी सुरेश हे बाहेरून घरी आले व सचिनने वडिलांवर आरडाओरड केली. “तुम्ही माझ्या लग्नासाठी मुलीच शोधत नाही,” असा आरोप लावत त्याने शिवीगाळ सुरू केली. वडील त्याला समजावत असतानाच त्याने लाकडी बॅट हातात घेतली व वडिलांवर हल्ला केला. त्याने बॅटने सुरेश यांच्या गुडघ्यावर व हातांवर वार केले. त्यात सुरेश यांचा एक पाय फ्रॅक्चर झाला. वडील पोलिसांत जाऊ शकतात याची सचिनला कल्पना होती. त्यामुळे जर पोलीस तक्रार केली तर ठार मारण्याचीदेखील धमकी दिली. या प्रकारामुळे सुरेश यांनी घाबरून तहसील पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना तातडीने मेयो इस्पितळात दाखल केले. त्यांच्या तक्रारीवरून सचिनविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.