अकोला : कौटुंबिक वादातून जावयाने धारदार शस्त्राने वार करून सासूची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री हैदरपुरा भागात घडली. या प्रकरणात खदान पोलिसांनी जावयासह एका महिलेस ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा – ‘परिवर्तन’साठी पदयात्रा! अध्यात्म व कृषी संस्कृतीचे दर्शन; बुलढाणा मिशनचे शक्तिप्रदर्शन

हेही वाचा – “आम्ही काम कसे करायचे?” लहान संस्थांचा आयकर खात्यास सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गत काही महिन्यांपासून हैदरपुरा येथील जावई जावेद व सासू शमशाद बी रफिक खान यांच्यात वाद सुरू होता. या वादातून जावई जावेद याने सासू शमशाद बी यांच्यावर शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांनी पथकासह घटनास्थळावर धाव घेतली. आरोपी जावेद व त्याच्या पत्नीस ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपी व त्याच्या पत्नीची चौकशी करीत आहेत.