नागपूर: सर्व सामान्य माणसांचे जगण्याचे प्रश्न फक्त दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींपुरतेच मर्यादित नसून ते  त्या पलिकडचेही आहेत याचा प्रत्यय  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनता दरबारात रविवारी आला. या जनता दरबारात युवकांपासून वृद्धांपर्यंत सर्वच नागरिकांचे वेगवेगळे प्रश्न होते. पण एका वृद्ध दाम्पत्याने मांडलेली समस्या सर्वाचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरमध्ये नियमितपणे जनता दरबार आयोजित करून  लोकांच्या तक्रारी, गाऱ्हाणे ऐकतात, ते कधी  प्रशासकीय चौकटीत राहून  तर कधी त्याबाहेर जाऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या  जनता दरबारात सर्वसामान्य जनतेची गर्दी होते. कोणी रोजगारासाठी येतो तर कोणी महापालिका, सुधार प्रन्यास किंवा अन्य विभागाच्या समस्यांकडे लक्ष वेधतो. 

pune Kalyani group marathi news
मुखत्यारनाम्यासंबंधी आरोप निराधार; कल्याणी समूहाचे स्पष्टीकरण, कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचेही प्रतिपादन
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…
Audit Provisions in the Income Tax Act
प्राप्तिकर कायद्यानुसार लेखापरीक्षण म्हणजे काय? नवीन तरतुदी कुणाला लागू?
abortion, rape victim, High Court,
गर्भपात करावे की नाही हा सर्वस्वी बलात्कार पीडितेचा अधिकार, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
retirement planning, financial freedom, emotional aspects, senior financial planning, peace of mind, financial mentor, heritage, family values, mental preparation,
निवृत्तीच्या उंबरठ्यावरचं अर्थकारण!
Congress is involve in dispute between two factions of BJP Nagpur news
भाजपच्या दोन गटातील वादात काँग्रेसची उडी, काय आहे प्रकार
Yavatmal, Badlapur incident, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis, women's safety, Shakti Act, severe punishment, public sentiment, Maharashtra politics
बदलापूर घटनेवर अजित पवारांची तिखट प्रतिक्रिया…म्हणाले, तो जो आरोपी आहे त्याचे….

हेही वाचा >>> साडेचार क्विंटल गोमांसाची तस्करी, दोन आरोपी ताब्यात

रविवारी (८ ऑक्टोबर) त्यांच्याकडे आलेल्या वृ्ध्द दाम्पत्याने गडकरींना मुलाच्या बदलीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. ते म्हणाले “ साहेब, आमच्या मुलाला घरापासून लांब नोकरी आहे. आम्ही दोघेही वृद्ध असून घरी एकटेच असतो. विविध आजारांनी आम्हाला ग्रासले आहे. आपण पुढाकार घेऊन मुलाच्या नागपुरातील बदलीसाठी प्रयत्न करा” गडकरी यांनी. या वृद्ध दाम्पत्याचा अर्ज स्वीकारला. शक्यता तपासून सहकार्य करण्याच्या सूचना त्यांनी सर्वसंबंधितांना दिल्या.