नागपूर : ऑनलाईन गेमिंगमधून ५८ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सोंटू जैनला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘ॲक्सिस बँक’ लॉकर फसवणूत प्रकरणात जामीन दिला आहे. फसवणूक करून लॉकर उघडल्याबाबत आणि बँकेतून भरीव रक्कम हलवल्याबद्दल त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यात जैनचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोंदियातील ‘ॲक्सिस’ बँकेच्या शाखेत डॉ. गौरव बग्गा यांच्या नावाने जैन यांनी तीन नवीन लॉकर उघडले होते. लॉकर्समधील कोट्यवधी रुपये आणि सोने डॉ. बग्गा यांच्या ल़ॉकरमध्ये हलविण्याचा कट जैन यांनी आखला होता. डॉ. बग्गा यांच्या लॉकरमध्ये सोने आणि रोकड यशस्वीपणे हलवल्यानंतर ३० जुलै रोजी कोठारी यांच्याकडे या मौल्यवान वस्तू हस्तांतरित करण्यात आल्या. २० ऑक्टोबर रोजी शहर पोलिसांनी डॉ बग्गा यांच्या घरावर छापा टाकून तीन किलो सोने जप्त केले. यावेळी पोलिसांना विहिरीतून रोख १.३५ कोटी रोख रक्कम देखील प्राप्त झाली. या प्रकरणी पोलिसांनी सोंटूला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक केली होती. उल्लेखनीय आहे की सोंटू जैन यांच्यावर ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मद्वारे तब्बल ५८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी गोंदिया येथे छापा टाकला होता. २२ जुलै रोजी पोलिसांनी गोंदियातील सोंटूच्या निवासस्थानावर छापा टाकला. पोलिसांना त्याच्या निवासस्थानी १७ कोटी रुपये रोख, १४ किलो सोने आणि २९४ किलो चांदी अशी  एकूण २७ कोटी रुपयांची मालमत्ता सापडली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sontu jain who defrauded 58 crores granted bail in this case tpd 96 amy
Show comments