नागपूर : आंतरराष्ट्रीय बुकी सोंटू ऊर्फ अनंत जैनला शनिवारी न्यायदंडाधिकारी न्यायायलाने शुक्रवारपर्यंत (२७ ऑक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. बुकी सोंटू जैनची नव्याने चौकशी करण्यात येणार आहे.

शनिवारी सोंटूची पोलीस कोठडी समाप्त झाल्यामुळे गुन्हे शाखेने त्याला न्यायालयात हजर केले. या बनावट ऑनलाईन गेमींग अ‍ॅप फसवणूक प्रकरणाचा चौकशी तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाला ९ दिवसांच्या पोलीस कोठडीची विनंती केली होती. परंतु न्यायालयाने सोंटूला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. आता पुन्हा २७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी मिळाल्याने पोलीस सोंटूची नव्या पद्धतीने कसून चौकशी करणार आहे. १६ ऑक्टोबरला दुपारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी उके यांच्यासमक्ष सोंटूने आत्मसर्मपण केले होते.

Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा

हेही वाचा – गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये डॉक्टरांच्या प्रतीक्षेत, बालरोगतज्ञ आणि परिचारिकांसह सुमारे २०० पदे वर्षानुवर्षे रिक्त

हेही वाचा – वर्धा : किडनी प्रत्यारोपणात अव्वल, ‘या’ रुग्णालयाची शतकी कामगिरी

सोंटूला मदत करणारे आरोपी बँक व्यवस्थापक अंकेश खंडेलवाल आणि डॉ. गौरव बग्गा या दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने ८ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. हे दोघेही सोंटूचे मित्र असून त्यांनी सोंटूच्या बँक लॉकरमधून सोने आणि पैसे काढले होते. ते सर्व डॉ. बग्गा याची पत्नी डॉ. गरीमा बग्गा हिच्या नावाचे नव्याने उघडलेल्या बँक लॉकरमध्ये ठेवले होते. हा उलगडा सोंटूने पोलिसांकडे जमा केलेल्या मोबाईलमधून झाला आहे. पोलिसांनी डॉ. गौरव बग्गासह त्याची पत्नी डॉ. गरीमा बग्गा, सोंटूची आई कुसुमदेवी जैन, भाऊ मोंटू जैन, वहिणी श्रद्धा जैन यांच्याविरुद्ध गिट्टीखदान पोलीस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल केला आहे. तसेच सोंटूचा मित्र बंटी कोठारी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.