अकोला : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेत हमीभावाने खरेदीसाठी ज्वारी, बाजरी व मका पिकांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शिटाकळी, मूर्तिजापूर येथील खरेदी केंद्रावर ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. संकरित ज्वारी तीन हजार १८०, मालदांडी ज्वारीसाठी तीन हजार २२५, मक्यासाठी दोन हजार ९०, बाजरीसाठी दोन हजार ५०० हमीभाव आहे.
हेही वाचा – अमरावतीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार
हेही वाचा – वाशिम : वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना; सिग्नल यंत्रणाही कुचकामी!
शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी एनईएमएल पोर्टलवर करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पिकाची नोंद असलेला सातबारा, आधारलिंक असलेला बँकेचा खाते क्रमांक, आधारकार्डाची सत्यप्रत, मोबाइल क्रमांक, तसेच ऑनलाइन नोंदणी करत्यावेळी शेतकऱ्यांचा स्वत:चा फोटो घेणे बंधनकारक आहे. ज्वारी, मका, बाजरी उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावाचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार व जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी केले आहे.