अकोला : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता दक्षिण-मध्य रेल्वेने काचीगुडा ते बिकानेर दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. वाशीम, अकोलामार्गे धावणारी ही गाडी ६ मे पासून सुरू होणार आहे. २७ जूनपर्यंत ही गाडी धावणार आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

गाडी क्र. ०७०५३ (काचीगुड़ा-बीकानेर विशेष) ही गाडी ६ मेपासून आठवड्यातून दर शनिवारी रात्री ९:३० वाजता काचीगुडा येथून प्रस्थान करून सोमवारी दुपारी १:५० वाजता बिकानेर स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी आगामी २४ जूनपर्यंत धावणार आहे. अकोला स्थानकावर ही गाडी रविवारी सकाळी ९:२० वाजता येणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०७०५४ ( बीकानेर- काचीगुडा विशेष) ही गाडी दर मंगळवारी रात्री ८:१५ वाजता बिकानेर येथून रवाना होऊन गुरुवारी सकाळी ९:४० वाजता काचीगुडा स्थानकावर पोहोचणार आहे.

inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
nada update on hima das suspension creates confusion
हिमा दासच्या निलंबन कालावधीवरून गोंधळ
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात
new Maharashtra ST bus station at Shivajinagar will feature modern conveniences and design
शिवाजीनगर बस स्थानकाबाबत प्रवाशांसाठी खुशखबर! असा होणार कायापालट
mumbai Eastern Express Highway
पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी प्रवास अतिवेगवान, १८० मीटरची मिसिंग लिंक पूर्ण; सोमवारपासून मार्ग सेवेत
Chetak Festival, Horse Sarangkheda Chetak Festival,
अबब…सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये १९ कोटींचा घोडा

हेही वाचा – वर्धा : अवकाळी पावसामुळे भाजीपाला स्वस्त, शेतकरी मात्र त्रस्त

ही गाडी बुधवारी रात्री ९:२५ वाजता अकोला स्थानकावर येईल. या गाडीत प्रथमश्रेणी वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानुकुलीतसोबतच स्लिपर व जनरल डबे असणार आहेत.

Story img Loader