नागपूर : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेतर्फे कुंभमेळासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येत आहे. या गाडीला गोंदिया – जबलपूर -गोंदिया पॅसेंजर गाडीचे डबे वापरण्यात येणार आहे. त्यामुळे नियमित धावणारी पॅसेंजर गाडी दोन दिवस रद्द करण्यात येत आहे. कुंभमेळा स्पेशल ट्रेन सुरू करण्यासाठी जबलपूर-गोंदिया-जबलपूर ट्रेनचा ‘रेक’ वापरण्यात येत आहे. त्यामुळे गाडी क्रमांक ५१७०७/५१७०८ जबलपूर-गोंदिया-जबलपूर १० आणि ११ फेब्रुवारी २०२५ ला रद्द करण्यात आली आहे, असे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कळवले आहे.
यापूर्वी मध्य रेल्वेने कुंभमेळासाठी नागपूर येथून चार गाड्या सोडण्यात आल्या. ५ ते ९ फेब्रुवारी २०२५ ला नागपूरहून दानापूरकडे सोडण्यात आली होती. प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभ मेळ्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान चार विशेष गाड्या सोडण्यात आल्या. कुंभमेळा विशेष गाडी नागपूर येथून बुधवारी दुपारी १२ वाजता निघत होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५० वाजता दानापूर येथे पोहोचत होती. कुंभमेळा विशेष गाडी दानापूर येथून ६ फेब्रुवारीला दुपारी २.३० वाजता निघत होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४० वाजता नागपूर येथे पोहोचत होती. कुंभमेळा विशेष गाडी नागपूर येथून ८ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता निघत होती आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता दानापूर येथे पोहोचली. कुंभमेळा विशेष गाडी दानापूर येथून ९ फेब्रुवारीला दुपारी २.३० वाजता निघत होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४० वाजता नागपूर येथे पोहोचत होती.
प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येमुळे करोडो भाविकांची गर्दी जमली होती. यादरम्यान मध्यरात्री १ वाजता (२९ जानेवारी) रोजी संगम किनाऱ्यावर अमृतस्नानापूर्वी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली.
कुंभमेळ्याच्या ‘शाही स्नाना’साठी प्रयागच्या त्रिवेणी संगमावर हजारो भाविक जमतात. भारताच्या उत्तर भागातच, प्रमुख चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावरील ‘गोदावरी’ नदी, जी गंगा नदी नंतर भारतातील सगळ्यात मोठी नदी आहे! ही जर सीमारेषा मानली तर, तिच्या पलीकडील उत्तरेकडील भागात प्रामुख्याने ‘कुंभमेळा’ भरतो. गेल्या दशकभरात, भारतात माहिती-तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असताना… ‘व्हॅाटस्ॲप’, ‘इन्स्टाग्राम’, ‘फेसबुक’, ‘एक्स’ (पूर्वीचे ‘ट्विटर’) या समाज माध्यमांचा वापर वाढला आहे.