गोंदिया : पॅसेंजर, एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना तासनतास विलंब व ऐनवेळी अचानक रद्द होण्याचे प्रकार गेल्या एका वर्षापासून सातत्याने सुरू आहेत. यामुळे प्रवाशी हैराण होत आहेत. तर एकीकडे मात्र याच काळात रेल्वेने मालवाहतुकीतून गेल्यावर्षीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. त्यामुळे मालवाहतूकीतून रेल्वे प्रशासन मालामाल होत असले तरी प्रवाशांचे मात्र बेहाल झाले आहे.

तिसऱ्या किंवा चौथ्या रेल्वे लाईनचे काम सुरू असल्याचे कारण सांगून रेल्वेच्या नियोजनात गोंधळ सुरू आहे. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेकडून ८ ते १५ ऑक्टोबर दरम्यान तब्बल ३५ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे सणासुदीच्या या काळात रेल्वे प्रशासनावर प्रवाशांचा रोष वाढत आहे. गाड्या रद्द केल्याने वृद्ध आणि लहान मुलांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रतीक्षालये हाऊसफूल असल्याने तिकीट बुकिंग कक्षच आता प्रवाशांचा आधार झाला असल्याचे चित्र गोंदिया रेल्वे स्थानकातून दिसून येत आहे. नुकताच मध्य रेल्वे तर्फे मालवाहतूकीतून सप्टेंबर महिन्यात ३०१.९३ कोटींचे महसूल प्राप्त केल्याचे जाहीर केले आहे. जे मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत २० टक्के अधिक आहे.

Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
New Car Launch Tata launches Tiago and Tigor in 2025
५ लाखांत टाटाने लाँच केली नवी कार! अपडेटेड Tiago आणि Tigor चे फीचर्स एकदा बघाच; थेट Marutiला देत आहे टक्कर
Badlapur, chemical sewage channel, underground sewerage scheme, old channel, sewage Badlapur, l
बदलापूर : रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार! १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार
yard remodeling trains
नागपूर : यार्ड रि-मॉडेलिंगसाठी दिल्ली मार्गावरील काही रेल्वेगाड्या रद्द
1975 International Womens Year completing 50 years
स्त्री चळवळीची पन्नाशी: भगिनीभाव जिंदाबाद!
Central railway special trains cancelled delayed
१० महिन्यात २०२ विशेष रेल्वेगाड्या रद्द, १ हजार १४६ विशेष गाड्यांना बिलंब
passenger and memu special trains running from cr bhusawal division of operated with regular numbers
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे…‘या’ गाड्यांमध्ये आजपासून झाले बदल

हेही वाचा >>>सावनेरातील रॉयल लॉजवर देहव्यापार, पोलिसांनी छापा टाकताच…

विशेष म्हणजे, मध्य रेल्वेकडून यंदाच्या सप्टेंबर महिन्यात ८०५ मालगाड्यांच्या माध्यमातून कोळसा, लोखंड, खनिज, सिमेंट, कंटेनर, ट्रॅक्टर, आयरन स्टीलसह विविध वस्तूंची २.७८ टन मालवाहतूक केली आहे. यातून रेल्वेला ३०१.९३;कोटी रुपयांचे महसूल प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या चालू आर्थिक वर्षात रेल्वेला मालवाहतुकीतून झालेल्या उत्पन्नाकडे लक्ष दिल्यास एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने २४६८.५६ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. असे असले तरी प्रवाशांच्या सोयी सुविधांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द किंवा अनेक रेल्वेगाड्यांचे उशिराने होत असलेले परिचलन यामुळे रेल्वे प्रवासी पुरते वैतागले आहे.

हेही वाचा >>>बलात्कारी गुराख्याची माहिती देणाऱ्याला ५ लाखांचे बक्षीस; ७ दिवसांनंतरही आरोपी फरार

मालगाडीचे वेळापत्रक सुरळीत

एकीकडे प्रवासी रेल्वेगाड्या विलंबाने धावत असताना दुसरीकडे मालगाड्यांचे परिचालन मात्र सुरळीत सुरू आहे. त्यामुळे मालगाड्यांना प्राथमिकता देऊन प्रवासी गाड्यांना विलंब करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून वाढू लागल्या आहेत. कोळसा, लोखंड, सिमेंट आदी मालवाहतूक होत असताना प्रवाशांच्या सुविधांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Story img Loader