बुलढाणा : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ७ लाख हेक्टर क्षेत्रावरील खरिपाच्या पेरण्या रखडल्या असून झालेल्या पेरण्या उलटण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे जुलैमध्येही २५० गावांतील पाणी टंचाईची तीव्रता कायम असल्याचे चित्र आहे.

दमदार पाऊस न झाल्याने सुमारे २९ हजार हेक्टरवरील झालेल्या पेरण्या धोक्यात आल्या आहे. या तुलनेत तब्बल ७ लक्ष हेक्टरवरील पेरण्या अजूनही रखडल्या आहेत. किमान ७० मिलिमीटर वा शेत जमिनीत ४ ते ५ इंच ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. यामुळे लाखो शेतकरी चिंताग्रस्त झाले असून दमदार पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. या परिणामी मूग, उडीद या पिकांच्या पेऱ्यात घट येणार आहे.

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
Madhukar Kukde returns to BJP after 10 years
तब्बल १० वर्षांनंतर मधुकर कुकडे यांची भाजपात घरवापासी
incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
Marathwada vidarbh farmers
विश्लेषण: सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी का? ७० हून अधिक मतदारसंघांमध्ये ठरणार निर्णायक मुद्दा?
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?

हेही वाचा – “मलाही दादांची ऑफर होती” आमदार शिंगणेंचा गौप्यस्फोट; ‘एमइटी’ च्या बैठकीलाही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती

टंचाईची तीव्रता कायम

जुलै महिना सुरू झाला असला तरी पाणी टंचाईची तीव्रता कायम असल्याचे गंभीर चित्र आहे. जिल्ह्यातील २२ गावांना २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच २३० गावांतील लाखावर ग्रामस्थांची तहान २५७ अधिग्रहित खाजगी विहिरींद्वारे भागविली जात आहे. जुलै लागला तरीही पाऊस अपुराच आहे. ५ जुलै अखेर जिल्ह्यात सरासरी ५४ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे.