अमरावती : यंदा मोसमी पावसाने ऐनवेळी पाठ फिरवल्याने पश्चिम विदर्भातील सुमारे ८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या अडचणीत सापडल्या आहेत. यंदा आतापर्यंत केवळ ३० टक्के पाऊस झाला आहे. विभागात अमरावती, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात जमिनीतील ओलावा पाहून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पावसाच्या अंदाजानंतरही पाऊस बरसला नाही. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. सुमारे २४ लाख हेक्टरवरील खरिपाची पेरणी खोळंबली आहे.
अमरावती विभागात जून महिन्यात सरासरी १४७ मिमी पाऊस कोसळतो. यावर्षी केवळ ४८ मिमी पाऊस झाला. हा पाऊस मासिक सरासरीच्या ३३ टक्के आहे. या पावसात ६७ टक्के तूट आली आहे. जुलैतही पावसाने चांगलीच उघडीप दिली. गेल्या चार दिवसांत केवळ ३.१ मिमी पाऊस झाला आहे.पेरणीकरिता आवश्यक असलेला पाऊस झालेला नसतानाही काही भागांत शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पेरणीचा कालावधी संपत आल्यामुळे शेतकऱ्यांनी अपुऱ्या पावसातच पेरणीकरिता घाई केली. आता ही पेरणी शेतकऱ्यांच्या अंगलट आली आहे.
हेही वाचा >>>नागपूर : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचे पोस्टर फाडले, शहर कार्यकारिणीची शरद पवारांना साथ
विभागात आतापर्यंत झालेल्या पेरणी क्षेत्रापैकी ४३ टक्के क्षेत्रात कापूस तर २० टक्के क्षेत्रात सोयाबीनचा पेरा झाला आहे. अमरावती जिल्ह्यात २ लाख ७ हजार हेक्टरमध्ये यवतमाळ जिल्ह्यात ३ लाख ३९ हजार हेक्टर आणि वाशीम जिल्ह्यात १ लाख १७ हजार हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. अकोला जिल्ह्यात केवळ ७ टक्के आणि बुलढाणा जिल्ह्यात १३ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. मूग आणि उडदाच्या पेरणीचा कालावधी आता उलटला आहे. या कडधान्य पिकाचे क्षेत्र यंदा फारच कमी राहण्याची शक्यता आहे.कुठे उगवलेले कोवळे बिजांकुर आता किडींचे लक्ष्य ठरत आहेत तर काही भागात जमिनीतील आर्द्रतेअभावी बियाणे जमिनीतच खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.
हेही वाचा >>>Video : राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलेल्या बकऱ्यांच्या व्हिडीओची चर्चा; सोशल मीडियावर धुमाकूळ
अमरावती विभागात आतापर्यंत २५ टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत, उगवण स्थितीतील पिकांना पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. हवामान विभागाने ६ ते ७ जुलै दरम्यान चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्यास उर्वरित भागात पेरण्या होऊ शकतील.- किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.