बुलढाणा : चोहोबाजूंनी समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या हजारो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांना यंदा पारावर उरला नाहीये. सोंगणीसाठी चढ्या दराने मजुरी देण्याची तयारी असतानाही मजूर मिळत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

मागील वर्षी सोंगणीची मजुरी २८०० ते ३ हजार रुपये प्रतिएकर होती. यंदा पीक हातचे गेल्यावरही ३५०० ते ४ हजार रुपये दरम्यान मजुरीचे दर गेले आहे. काढणी हंगामाच्या प्रारंभी ३२०० ते ३४०० दरम्यान असलेले दर ४ हजारांच्या घरात गेले. मात्र चार हजार देऊनही मजूर मिळत नसल्याने वा त्यासाठी आठवडाभर वाट पहायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे बळीराजा घायकुतीला आला आहे.

Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Gondia known as Maharashtra s granary sees farmers shifting towards maize and gram this rabi season
धानाचे कोठार, पण शेतकऱ्यांचा कल मका, हरभऱ्याकडे
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
After soybeans price of cotton become big issue for farmers in Vidarbha
विदर्भात कापसाचे अर्थकारण विस्‍कळीत

हेही वाचा – “गडकरींचे व्यक्तिमत्त्व राज कपूरसारखे, छोटे स्वप्न… ”, काय म्हणाले फडणवीस?

सुडी लावायची मजुरी ५०० रुपये तर मळणीचा दर २५० रुपये प्रतिपोते (क्विंटल) मोजावे लागत आहे. कडक उन्हामुळे शेंगा झपाट्याने वाळत असल्याने शेतकरी सोंगणीसाठी धडपडत असताना मजूर मिळत नसल्याने अडचणीत आला आहे.

हेही वाचा – “गडकरींचे व्यक्तिमत्त्व राज कपूरसारखे, छोटे स्वप्न… ”, काय म्हणाले फडणवीस?

जेवढा भाव तेवढी मजुरी!

बाजारात आलेल्या सोयाबीनला सध्या ४ हजार ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल असा तोकडा भाव मिळत आहे. एका एकराच्या सोंगणीइतका हा भाव असल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही भरून निघत नाहीये. यावर कळस म्हणजे अनियमित अपुरा पाऊस व ऐन बहराच्या वेळी ‘यलो मोझॅक’ने केलेला कहर यामुळे उत्पादनात लक्षणीय घट झाली. प्रतिएकर सरासरी ४ ते ५ क्विंटल असा उतारा आहे. यातही व्यापारी आद्रतेच्या नावावर कमी भाव लावत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काय पडणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Story img Loader