बुलढाणा: सोयाबेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात सोयाबिनला जेमतेम भाव मिळत असताना जळगाव तालुक्यातील आसलगाव ‘मार्केट यार्ड’ मध्ये विक्रमी असा ४९२५ रुपये असा भाव मिळाला.  विशेष म्हणजे याचे चुकारे ‘कॅश’ मध्ये देण्यात आले. यामुळे जळगाव तालुक्यातील दसरा गोड झाला…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज  २४ ऑक्टोबर  रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर  जळगांव जामोद बाज़ार समितीच्या आसलगाव  उप समिती येथे सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. दसरा असतानाही १२०० रूपये क्विंटल सोयाबिन ची आवक झाली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सभापती प्रसेनजीत पाटिल तथा संचालक मंडळाने ल शेतमालांचे चुकारे राेख रकमे स्वरुपात  देण्याचा  शुभारंभ  करण्यात आला. शेतकर्यांना चेकद्वारे होनाऱ्या चुकारांमुळे विविध अडचनींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे शेतकर्यांच हित लक्षात घेता संचालक मंडळाने दसर्याच्या मुहुर्ता पासून रोख रकमेच्या स्वरुपात चुकारे देण्याचा निर्णय घेतला.  व्यापारी वर्गाने सुध्दा या निर्णयाचे स्वागत केले.

हेही वाचा >>>बुलढाणा : गड किल्ले भाड्याने देण्याचे संतप्त पडसाद, ‘शिवप्रेमीं’ची जिल्हा कचेरीसमोर निदर्शने

आज मंगळवारी  धान्य बाजारात  सभापती  प्रसेनजीत पाटील,  संचालक दत्ता पाटिल, विश्वास भालेराव, उल्हास माहोदे, महादेव भालतडक, प्रभात पाटिल, मनोज राठी, शैलेश दैय्या, प्रशांत अवसरमोल उपस्थित होते. आज या वर्षीचा हंगामातील सर्वात जास्त ४९२५ रुपये प्रति क्विंटल भाव सोयाबीनला मिळाला. हा जिल्ह्यातील विक्रमी भाव ठरावा.