लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात असला, तरी बियाण्यांच्या दरात झालेली वाढ, उगवण क्षमतेविषयी हमीचा अभाव आणि अधिक मागणी असलेल्या वाणांचा तुटवडा यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत.
अमरावती विभागात यंदा सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. विभागात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र हे १४.३८ लाख हेक्टर आहे. यंदाच्या खरीप हंगामात १५.०६ लाख हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा अपेक्षित आहे. विभागात ३५ टक्के बियाणे बदल दरानुसार सुमारे ३.८१ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रस्तावित क्षेत्रासाठी एकूण ११.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे आवश्यक आहे.
आणखी वाचा-नवीन शैक्षणिक धोरणामुळे प्राध्यापकांना बेरोजगारीचा धोका!
खरीप २०२३ मधील ग्राम बीजोत्पादन मोहिमेद्वारे अधिक शेतकऱ्यांनी स्वत:कडील राखून ठेवलेले बियाणे असे स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारे बियाणे १४.५४ लाख क्विंटल असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. हे बियाणे वगळता इतर स्त्रोतांद्वारे १.९१ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. गेल्या हंगामात ४.२१ लाख क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. २०२२ मध्ये ३.७१ लाख क्विंटल तर २०२१ मध्ये ५.१२ लाख क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी विकत घेतले होते. विभागात सरासरी विक्रीची आकडेवारी ही ४.३५ लाख हेक्टर आहे.
काही खासगी बियाणे कंपन्यांनी मागणी असलेल्या सोयाबीन बियाण्यांचे दर भरमसाठ वाढवलेले आहेत. एका कंपनीने २३ किलो वजनाच्या बॅगची किंमत तब्बल ४ हजार १५० रुपये काढली आहे, तर दुसरे वाण २५ किलो बॅगमध्ये ३ हजार ४५० रुपयांना विकल्या जात आहे. काही नावाजलेल्या वाणासोबत त्याच कंपनीचे कीडनाशक घेण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी आहेत.
आणखी वाचा-अकोला जिल्ह्यातील बेलखेडमध्ये ‘कॉलरा’चा उद्रेक; आणखी २० रुग्ण आढळले
सोयाबीन बियाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन कृषी विद्यापीठांनी मूलभूत बियाणे उत्पादित करून त्याचा पुरवठा महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांना करावा, जेणेकरून या कंपन्या मूलभूत बियाण्यापासून पायाभूत व प्रमाणित बियाणे उत्पादित करून त्याचा शेतकऱ्यांना पुरवठा करतील असा शासन निर्णय २०२१ मध्ये जारी करण्यात आला. पण, अजूनही ही व्यवस्था परीपूर्ण होऊ शकली नाही.
सद्यःस्थितीत बाजारपेठेत सोयाबीनच्या दरात घट होऊन २०२१ च्या ८ हजार रुपये प्रति क्विंटल या सरासरी दरावरून वरून ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. दुसऱ्या बाजूला बदलत्या हवामानामुळे सोयाबीनवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. कीटकनाशके व खते यांच्या वाढत्या किमतीमुळे उत्पादन खर्च मात्र वाढत आहे. यातच अधिक मागणी असलेल्या बियाण्याच्या दरातील वाढीचा भार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर पडणार आहे. -पौरूष पाटील, शेतकरी, दहीगाव पूर्णा.