नागपूर :  राज्यात वन्यजीव सप्ताह सुरू असून मान्सूननंतर नुकताच राज्यातील अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी सुरु करण्यात आले आहे. यानिमित्त पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी खास ह्णसायकल सफारीह्णह्ण ही सुरू करण्यात आली आहे. आता पर्यटकांना जिप्सी सफारीसह सायकल सफारीचा आनंदही घेता येणार आहे. विशेष म्हणजे या सायकल सफारीदरम्यान पर्यटकांसोबत सायकलवर चालणरे पर्यटक मार्गदर्शक देखील असंणार आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पात कोलीतमारा ते कुवाराभिवसेन दरम्यान तब्बल ४८ किलोमीटर लांबीची ह्णचितळ सायकल सफारीह्णह्ण पर्यटकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या सायकल सफारी दरम्यान पर्यटकांना सोबत सायकलवर चालणरे मार्गदर्शक मिळणार आहे.जंगलात एखादी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला कसे सामोर जायचे यासाठी हे मार्गदर्शक प्रशिक्षित असणार आहेत. सोबतच त्यांच्याकडे प्रथमोपचार किटसह अडचणीच्या प्रसंगी आवश्यक औषध आणि साहित्यही उपलब्ध असणार आहे.

wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
army recruitment, Deolali camp, nashik district
सैन्य भरतीसाठी देवळाली कॅम्प येथे एकाच दिवसात १२ हजार तरुण उपस्थित
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला

हेही वाचा >>>“ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेसला प्रस्तावच नाही,” खासदार कुमार केतकर यांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले…

या सायकल सफारीसाठी अत्याधुनिक गेअर असलेल्या सायकल वन विभागाकडूनच उपलब्ध होणार आहे. त्यासाठी तीनशे रुपये प्रति सायकल असा दर आहे.या सायकल सफारी दरम्यान पर्यटक घनदाट जंगलात, वळणदार रस्त्यांवर, निसर्ग संपन्न वन क्षेत्राच्या सानिध्यात सायकल चालवण्याचा आनंद घेता येणार आहे. शिवाय वन्यप्राणी, पक्षी, कीटक यांचे अवलोकन ही ते करू शकणार आहे.  सध्या या सायकल सफारीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • कोलितमारा ते कुवारा भिवसिंग ४८ किलोमीटरचे अंतर
  • निसर्गरम्य वातावरणात घनदाट जंगलातून सायकल सफारीचा ट्रेक असल्याने ही आरोग्यदायी सफारी
  • ४-८किलोमीटरच्या सफारी दरम्यान हरीण, चितळ, सांभार सारखे तृणभक्षी, विविध प्रजातीचे पक्षी, फुलपाखरू, कीटक आणि नशीब चांगले असल्यास वाघ ही पाहायला मिळेल
  • सायकल सफारीसाठी वन विभाग 300 रू दराने अत्याधुनिक सायकल देणार. स्वत:ची सायकल वापरायची असल्यास १०० रुपये दर
  • सोबत वायरलेस सेट, प्रथमोपचार किट, आणि अत्यावश्यक वस्तूंसह प्रशिक्षित गाईड ही राहणार.
  • सायकल सफारीच्या मार्गावर अनेक आदिवासी गावे आहेत.