गोंदिया : १५ जून रोजी जागतिक फाटक जागृती दिवस साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने रेल्वेचे फाटक पार करतांना घेण्यात येणाऱ्या सुरक्षितता व नियमांचे पालन करण्याच्या उद्देशाने दक्षिण – पूर्व मध्य रेल्वे नागपुर मंडळाच्या सुरक्षा विभागाद्वारे ११ ते १६ जून या कालावधीत विशेष सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या अभियानातंर्गत रेल्वे व्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांच्या नेतृत्वात व वरिष्ठ मंडळ सुरक्षा अधिकारी दिलीप सिंह यांच्या मार्गदर्शनात सुरक्षा स्वयंसेवक तसेच संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याच्या द्वारे मंडळातंर्गत सर्व रेल्वेच्या भागात रेल्वे फाटक पार करणाऱ्या नागरिकांना पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. तसेच फाटक बंद असतांना रेल्वे मार्ग पार करू नये, फाटक बंद झाल्यानंतर ते उघडण्यापर्यंत प्रतिक्षा करावी.फाटकावर वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. तसेच रेल्वे फाटक पार करतांना मोबाईल, इयरफोनचा वापर करू नये. याशिवाय मंडळाच्या प्रमुख स्टेशनवर बॅनर, पोस्टर तसेच घोषवाक्यांचा च्या माध्यमातून प्रवाशांना वेगाने येणाऱ्या गाडीच्या समोर बंद फाटक पार करू नये तसेच फाटक उघडल्यानंतर सुरक्षितेत फाटक पार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.