लोकसत्ता टीम
नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत असून २० डिसेंबर पर्यंत चालणार आहे. त्यासाठी नागपूरकडे येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई ते नागपूर विशेष रेल्वेगाडी चालवणार आहे.
ही विशेष गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबणार आहे. या गाडीला १७ डब्बे असातील. त्यात एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि ५ सामान्य द्वितीय श्रेणी डबे राहतील.
आणखी वाचा-यवतमाळ : देशी बनावटीचे पिस्टल सहज होतात उपलब्ध! ११ महिन्यांत १६ कारवाया
०२१०३ सुपरफास्ट विशेष गाडी शनिवार २ डिसेंबरला सीएसएमटी, मुंबई येथून रात्री ८ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ३.३२ वाजता पोहोचेल. त्यासाठी आज, गुरुवारपासून तिकिट विक्रीला सुरुवात झाली.