अमरावती : अयोध्‍या येथे २२ जानेवारीपासून प्रभू श्रीरामाचे मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. रामभक्‍तांना रामलल्‍लांचे दर्शन घेता यावे, यासाठी नवी अमरावती रेल्‍वेस्‍थानकावरून विशेष रेल्‍वेगाडीच्‍या दोन फेऱ्या सोडण्‍यात येणार आहेत.मध्‍य रेल्वेने नवी अमरावती (अकोली) रेल्‍वे स्‍थानकावरून ७ व २५ फेब्रुवारीला दर्शन नगर अयोध्या आस्था रेल्वेची सोय केली आहे. ही रेल्वे ९ व २७ फेब्रुवारीला अयोध्येहून परत निघेल. त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय अमरावतीकर प्रवाशांना थेट शहरातून अयोध्येला जाणे व दर्शन घेतल्यानंतर परत येणे शक्य होणार आहे.

जास्तीत जास्त भाविकांनी रामलल्लांचे दर्शन घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांच्या सूचनेवरून रेल्‍वेने देशभरातील विविध ठिकाणांहून अयोध्येसाठी आस्था विशेष रेल्‍वेगाड्या सुरू केल्या आहेत. अमरावतीतूनही अयोध्येसाठी रेल्वे गाडी सोडावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्री, रेल्वे राज्य मंत्र्यांकडे केली. त्यानंतर अमरावतीला आस्था रेल्वेच्या दोन फेऱ्या मिळाल्या आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>>चंद्रपूर : शिकारीच्या शोधात वाघाचा विहिरीत पडून मृत्यू

या गाडीचे बुकिंग फक्त आयआरसीटीसी मार्फतच होणार आहे. तसेच भाविकांना रेल्वेत शाकाहारी जेवण दिले जाणार आहे. नवी अमरावती (अकोली) रेल्वे स्‍थानकापासून अयोध्येतील दर्शननगर रेल्वे स्टेशन हे अंतर १४५२ किमी. असून २६ तास ५० मिनिटांचा हा प्रवास आहे. नवी अमरावती रेल्वे स्‍थानकावरून पहाटे ५.१५ वाजता ही गाडी प्रस्थान करेल. मार्गात वर्धा, नागपूर, काटोल, नरखेड, पांढुर्णा व इतर स्टेशनवरून पुढे जात सकाळी ८.०५ वाजता दर्शननगर अयोध्या येथे पोहोचेल. परतीचा प्रवास हा २७ तास १० मिनिटांचा आहे. दर्शननगर अयोध्या येथून ही गाडी सायंकाळी ६.५० वाजता नवी अमरावतीकडे निघेल व दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजता पोहोचेल. या गाडीला एकूण २२ डबे असून, त्यात २० स्लीपर कोच तर दोन गार्डचे कोच राहणार आहेत. ७ फेब्रुवारीला खासदार नवनीत राणा, खासदार डॉ. अनिल बोंडे हे रेल्‍वेगाडीला हिरवी झेंडी दाखवतील.

Story img Loader