लोकसत्‍ता टीम

अमरावती : अवकाश निरीक्षक, अभ्यासक यांच्या दृष्टीने सूर्यमालेतील एक महत्त्वाचा ग्रह म्हणजे शनी होय. शनीच्या भोवतीने असलेल्या कड्यामुळे शनीचे वेगळेपण खुलून दिसते. शनी ग्रह येत्‍या ८ सप्‍टेंबरला पृथ्वीच्या जवळ राहणार आहे. या दिवशी शनी ग्रह हा अगदी सूर्यासमोर राहील. याला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात. प्रतियुतीच्या आसपास शनी व पृथ्वी यांचे सरासरी अंतर कमी असते. त्यामुळे या काळात शनीची सुंदर कडी चांगल्या प्रकारे दिसू शकते. तथापि ही कडी साध्या डोळ्यांनी नव्हे तर दुर्बिणीने पाहावी लागणार आहे. ही घटना डोळ्यात टिपण्यासाठी नागरिकही उत्सुक झाले आहेत.

sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Gajakesari Yoga
१६ नोव्हेंबरला निर्माण होणार शक्तीशाली गजकेसरी योग! ‘या’ राशींचे लोक जगणार आलिशान आयुष्य, नव्या नोकरीसह होईल धनलाभ
From November 16 the fortunes of these zodiac signs
१६ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे भाग्य चमकू शकते, ग्रहांचा राजा सूर्याचा नकारात्मक प्रभाव संपणार
13th November Daily Rashibhavishya In Marathi
तुळशी विवाह, १३ नोव्हेंबर पंचांग: रेवती नक्षत्रात लागेल सुखाची चाहूल; प्रेम, व्यवसायासाठी पाहिलेलं स्वप्न होईल पूर्ण; वाचा तुमचे राशिभविष्य
Sun Planet Transit In Scorpio
५ दिवसांनंतर सुर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश, या राशींचे सुरु होणार चांगले दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश!
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान

शनीला एकूण ८२ चंद्र आहेत, यामध्ये सर्वांत मोठा चंद्र टायटन आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक चक्कर मारायला २९.५ वर्षे लागतात. या ग्रहाचा व्यास १.२० लाख किमी व तापमान शून्याखाली १८० अंश सेल्सिअस आहे. या ग्रहाची घनता सर्वांत कमी आहे. शनीची कडी २.७० लाख किमीपर्यंत पसरलेली व बर्फाची आहे. शनीचे वस्तुमान पृथ्वीच्या ९५ पट आहे. पृथ्वी ज्यावेळी शनीच्या विषववृत्त पातळीत असते, अशावेळी शनीचे कडे पृथ्वीवरून चांगल्या प्रकारे दिसू शकते. ही कडी साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. त्यामुळे ही दृश्ये पाहण्यासाठी विशिष्ट प्रकारची दुर्बीण वापरावी लागेल. त्यासाठीची माहितीही मराठी विज्ञान परिषदेमार्फत दिली जात आहे.

आणखी वाचा-नागपूर : चतुर्थश्रेणी कर्मचारी पदभरतीच्या ऑनलाईन परीक्षेत गोंधळ; उमेदवार परीक्षेला मुकले

पृथ्वी ज्या वेळी शनीच्या विषववृत्त पातळीत असते. अशा वेळी शनीचे कडे पृथ्वीवरून चांगल्या प्रकारे दिसू शकत नाही. शनीचा अभ्यास करणारे महिले मानवरहित यान ‘कॅसिनी’ हे आहे. व्हायेजर या मानवरहित यानानेसुद्धा शनीचे जवळून छायाचित्र घेतले आहे. ८ सप्टेंबरला सूर्य मावळल्यानंतर लगेच हा ग्रह पूर्व क्षितिजावर उगवेल आणि पश्चिमेला मावळेल, हा ग्रह रात्रभर आकाशात दिसेल.

हा ग्रह काळसर व पिंगट रंगाचा अगदी चमकदार असल्याने सहज ओळखता येईल. परंतु या ग्रहाची प्रसिद्ध रिंग साध्या डोळ्यांनी दिसू शकणार नाही. याकरिता टेलिस्कोपची आवश्यकता आहे. हा ग्रह पृथ्वीच्या जवळ आल्याने मानवी जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही. याआधी २७ ऑगस्ट २०२३ रोजी शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ आला होता, अशी मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.